Gurugram Accident: भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:02 AM2022-08-16T10:02:15+5:302022-08-16T10:02:34+5:30

तरुण-तरुणी राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे. 

Terrible accident in Gurugram! The truck overturned on the Innova; Four people died on the spot | Gurugram Accident: भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू

Gurugram Accident: भीषण अपघात! इनोव्हावर ट्रक उलटला; राजस्थानहून परतणाऱ्या चार तरुण, तरुणींचा जागीच मृत्यू

googlenewsNext

हरियाणाच्या गुरुग्राममध्ये वेगाच्या नशेने एक तरुणी आणि तीन तरुणांचा बळी घेतला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हा कारवर वेगाने येणारा ट्रक पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विलासपूर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांना इनोव्हा कारवर ट्रक उलटला असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी कार ट्रकखाली दबली गेली होती. 

पोलिसांनी तातडीने उपाययोजना करत कारमधून प्रवाशांना बाहेर काढले. परंतू, तोवर त्यातील एक तरुणी आणि तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्यापैकीच एक तरुणी आणि तरूण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताची चौकशी सुरु केली आहे. 


हे तरुण राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे. 
 

Web Title: Terrible accident in Gurugram! The truck overturned on the Innova; Four people died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात