उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 08:00 PM2022-03-16T20:00:58+5:302022-03-16T20:05:16+5:30

Immoral Relationship : दोन महिन्यांनी प्रकार उघडकीस: वर्तकनगर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

Shocking! lover murdered by wife on suspicion of having immoral relationship with husband | उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य

उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य

googlenewsNext

जितेंद्र कालेकर

ठाणे : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (३६) या महिलेने मनिषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी मुंबईतील रुग्णालयात मनिषाचा मृत्यू झाल्याने तिची आई मीरा खिरदेकर (६०, रा. साठेनगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्ररकणी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.


लोकमान्यनगर भागात मनिषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. तर ज्ञानेश्वरनगर भागात गीता वास्तव्याला आहे. पतीचे मनिषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादही सुरू होते. मनिषा ही कामानिमित्ताने २३ जानेवारी २०२२ रोजी तिच्या माहेरी गेली होती. त्याचवेळी अचानक गीताने मनिषाला जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनिषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचली. घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप तिच्या अंगावर ओतले. या घटनेत तिचा चेहरा, छाती, मान, पोट आणि पाय होरपळल्याने ती गंभीर जखमी झाली.

स्थानिक रहिवाशांनी तिला तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला शीव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर मनिषाची आई मीरा यांनी या प्रकरणात गीताविरुद्ध संशय व्यक्त करून १४ मार्च रोजी तक्रार दिली. त्याचआधारे १५ मार्च रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. गीताला याप्रकरणी अद्याप अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक महादू कुंभार हे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

पतीपासून वेगळे वास्तव्याला
पतीशी वाद झाल्याने गीता ही तिच्या माहेरी वास्तव्याला होती. या घटनेच्या आठ दिवस आधीच लोकमान्यनगर येथे तिने स्वतंत्रपणे भाड्याने खोली घेतली होती. त्याच घरात हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shocking! lover murdered by wife on suspicion of having immoral relationship with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.