अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:21 PM2022-02-13T15:21:01+5:302022-02-13T15:36:11+5:30

Drug Smuggling Case : तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Drugs worth Rs 60 crore seized at Mumbai airport, foreign woman hide in trolley bag | अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

googlenewsNext

मुंबई - मुंबईविमानतळावर  हवाई गुप्तचर विभागाने (AIU)  केलेल्या तपासणीत एका महिलेकडून 60 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही महिला झिम्बाब्वेची रहिवासी आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला १२ फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर आली होती. तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

झिम्बाब्वेच्या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ६० कोटी रुपये आहे. महिलेने हे ड्रग्ज तिच्या ट्रॉली बॅगमध्ये आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे  हवाई गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.

मुंबई विमानतळाच्या एआययूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक झिम्बाब्वेची महिला ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच अधिकारी सतर्क झाले आणि सर्व प्रवाशांवर कडक नजर ठेवली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "प्रवाशाकडून ड्रग्जची माहिती मिळताच गुप्तचर पथकाला आफ्रिकन प्रवासी मुंबईत येताना दिसले." यादरम्यान अधिकाऱ्यांची नजर एका झिम्बाब्वेच्या महिलेवर पडली. माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी महिला आणि तिच्या सामानाची तपासणी केली.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

फिल्मी स्टाईलने भरलं प्रेयसीच्या भांगेत कुंकू, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रियकराने फिरवली पाठ

तपासादरम्यान अधिकाऱ्यांना 7006 ग्रॅम हेरॉईन आणि मेथॅम्पचे मिश्रण सापडले. एवढेच नाही तर महिलेकडून 1480 ग्रॅम पांढरे क्रिस्टल ग्रॅन्युल जप्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिच्या ट्रॉली बॅगमध्ये दोन फाईल फोल्डरमध्ये ड्रग्ज लपवले होते आणि त्याची किंमत सुमारे 59,40,20,000 (पाच कोटी, चाळीस लाख, वीस हजार रुपये) आहे.

चौकशीत महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, हे ड्रग्ज दिल्लीला नेले जाणार होते. परदेशातील ड्रग्ज दिल्लीत नेल्यानंतर तिच्यावर मोफत उपचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. महिलेच्या अटकेनंतर अधिकाऱ्यांना भारतातील ड्रग्ज तस्करांशी संबंधित काही मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Drugs worth Rs 60 crore seized at Mumbai airport, foreign woman hide in trolley bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.