रस्त्यावर बैल आडवा आला, 14 लाखांची स्कॉर्पिओ पलटी झाली, स्टेपनीतून करोडोंचा 'धूर' निघाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 07:31 PM2021-06-06T19:31:05+5:302021-06-06T19:33:10+5:30

UP Crime news: बरेलीच्या दिल्ली-लखनऊ नॅशनल हायवेवरून सकाळी-सकाळी एक स्कॉर्पिओ वेगाने जात होती. याचवेळी रस्त्यात मध्येच एक बैल आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी चालकाने गाडी वळविली.

UP Crime news: scorpio accident in bareli, UP; got 4 kg heroin in car's stepany | रस्त्यावर बैल आडवा आला, 14 लाखांची स्कॉर्पिओ पलटी झाली, स्टेपनीतून करोडोंचा 'धूर' निघाला...

रस्त्यावर बैल आडवा आला, 14 लाखांची स्कॉर्पिओ पलटी झाली, स्टेपनीतून करोडोंचा 'धूर' निघाला...

googlenewsNext

म्हणतात ना जेव्हा नशीब आणि नियती दोन्ही खराब असेल तर मोठमोठ्या दुर्घटना होतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडला आहे. एका साध्या घटनेतून मोठे काहीतरी बाहेर येते. तसाच एक प्रकार घडला आहे. (scorpio accident in bareli, UP; got 4 kg heroin in car's stepany)


बरेलीच्या दिल्ली-लखनऊ नॅशनल हायवेवरून सकाळी-सकाळी एक स्कॉर्पिओ वेगाने जात होती. याचवेळी रस्त्यात मध्येच एक बैल आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी चालकाने गाडी वळविली. मात्र, त्याचा अंदाज चुकला आणि समोरून दुसऱ्या बाजुने येणाऱ्या सँट्रो कारवर आदळली आणि पलटी झाली. 


या दुर्घटनेत सँट्रो कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांसह 4 जण जखमी झाली. स्कॉर्पिओच्या चालकाने तेथून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक विजय कुमार यांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती केले. पोलिसांनी जेव्हा स्कॉर्पिओ कारची तपासणी केली तेव्हा तिची स्टेपनीचा टायर थोडा बाहेर आला होता. 


पोलिसांना संशय आला, स्टेपनीचा टायर काढला असता पोलिसांचे डोळे विस्फारले. स्टेपनीच्या टायरमध्ये 4 किलो 100 ग्रॅमची चार पाकिटे अमली पदार्थ होता. फॉरेन्सिक टीमने ते हेरॉईन असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 5 कोटी सांगितली गेली. पोलिसांनी स्कॉर्पिओमध्ये सापडलेल्या आधार कार्डांद्वारे आंतरराष्ट्रीय हेरॉईन तस्कर बबलू, नाजिस आणि कारचा मालक राजनला अटक केली आहे. 

Web Title: UP Crime news: scorpio accident in bareli, UP; got 4 kg heroin in car's stepany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.