Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:35 AM2022-11-07T10:35:58+5:302022-11-07T10:36:51+5:30

अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते.

Big update on Cyrus Mistry car accident; FIR has been registered against Driver Dr Anahita Pandole | Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

googlenewsNext

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिस्त्रींची कार चालवत असणाऱ्या मुंबईच्या प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट अनाहिता पंडोले यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाहिता यांच्या पतीने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्रींच्या कारपुढे आणखी एक कार होती...; डॉ. अनाहिता पंडोलेंच्या पतीचा मोठा खुलासा

कासा पोलिस ठाण्यात एफआयर नोंद करण्यात आला असून यामध्ये 304 (ए), 279, 336, 338 नुसार गुन्हा दाखल आहे. पालघर एसपी बाळासाहेब पाटील यांनी याची माहिती दिली आहे. अनाहिता पंडोले यांच्यावर आताही उपचार सुरु आहेत. त्या अद्याप आयसीयूमध्ये आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात अनाहिता यांचे पती डेरिअस पंडोले यांना तीन महिन्यांच्या उपचारानंतर सोडण्यात आले होते. 

अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. डेरियस हे आता बरे झाले असून त्यांनी अपघातावेळी नेमके काय घडले याची माहिती पोलिसांना दिली आहे. डेरियस यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी डेरियस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविला. डॉ अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट आहेत. त्याच कार चालवत होत्या. अपघातानंतर दोघांनाही मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. 

पंडोले यांना ४ सप्टेंबरला काय काय घडले हे ठीकसे आठवत नव्हते. त्यांना या घटनेची नीट आठवण करून दिल्यावर त्यांनी सारा घटनाक्रम सांगितला. पुढील कार तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये गेल्यावर पत्नीनेही आपली कार दुसऱ्या लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच तिला समोर ट्रक दिसला. यामुळे ती दुसऱ्या लेनमध्ये जाऊ शकली नाही. याचवेळी कार रेलिंगला आदळली, असे ते म्हणाले होते. यामुळे ओव्हरटेक करण्यात अनाहिता पंडोले फसल्या यामुळे अपघात झाल्याचे समोर आले. 

Web Title: Big update on Cyrus Mistry car accident; FIR has been registered against Driver Dr Anahita Pandole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.