अनिल देशमुखांची पुन्हा चौकशी होणार; पैशाच्या व्यवहारांत स्वीय साहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असल्याचा ED चा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 04:26 PM2021-06-26T16:26:49+5:302021-06-26T16:27:43+5:30

Anil Deshmukh to be questioned again : त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली.

Anil Deshmukh to be questioned again; The ED claims that assistants, including private secretaries, play an important role in money transactions | अनिल देशमुखांची पुन्हा चौकशी होणार; पैशाच्या व्यवहारांत स्वीय साहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असल्याचा ED चा दावा

अनिल देशमुखांची पुन्हा चौकशी होणार; पैशाच्या व्यवहारांत स्वीय साहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असल्याचा ED चा दावा

Next
ठळक मुद्देईडीने आणखी तपासाचा फास आवळला असून चौकशीसाठी ईडीने अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी (खाजगी सचिव) संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना कालच ताब्यात घेतलं आहे.दोन्ही स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र, ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीप्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासात ईडीच्या हातात अनेक पुरावे लागत आहेत. ईडीने मुंबईत काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना ४ कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब त्यांच्याकडून नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने आणखी तपासाचा फास आवळला असून चौकशीसाठी ईडीने अनिल देशमुख यांचे पर्सनल सेक्रेटरी  संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना कालच ताब्यात घेतलं आहे. मात्र, त्यांनी ईडी अधिकाऱ्यांना चौकशीत सहकार्य न केल्याने दोघांना अटक करण्यात आली.

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात देशमुख यांचे दोन्ही स्वीय साहाय्यक हे देखील १०० कोटीच्या वसुली प्रकरणात सहभागी असल्याचे दिसत आहे. जो काही पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तापासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

दोन्ही स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. मात्र, ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे. त्यातून ईडीच्या हाताला कोणती महत्वाची माहिती समोर येते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष आहे. 

Web Title: Anil Deshmukh to be questioned again; The ED claims that assistants, including private secretaries, play an important role in money transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.