काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:15 PM2024-03-15T15:15:40+5:302024-03-15T15:16:24+5:30

तिहार तुरुंगात कैद असलेला गँगस्टर योगेश टुंडा आज आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार आहे.

After Kaala Jathedi, notorious gangster Tunda will marry today; will tie the knot with my girlfriend | काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

काला जथेडीनंतर कुख्यात गँगस्टर टुंडा बोहल्यावर चढणार; आज प्रेयसीसोबत बांधणार लगीनगाठ

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडीच्या लग्नानंतर आता आणखी एक गँगस्टर बोहल्यावर चढणार आहे. दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद असलेला कुख्यात गँगस्टर योगेश टुंडाचे लग्न होणार आहे. योगेश टुंडा आज(शुक्रवार) आपल्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार असून त्यासाठी त्याला कोर्टाने त्याला 6 तासांचा पॅरोल मंजूर केला आहे. दिल्लीतील विकासपुरी येथील आर्य समाज मंदिरात टुंडाचे लग्न होईल. काला जथेडीप्रमाणे योगेश टुंडाला कडेकोट बंदोबस्तात आर्य समाज मंदिरात आणण्यात आले आहे.

टिल्लू ताजपुरियाची हत्येचा सूत्रधार
काही महिन्यांपूर्वी तिहार तुरुंगात कुख्यात गँगस्टर सुनील मान उर्फ टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या झाली होती, या हत्येचा सूत्रधार योगेश टुंडा आहे. टुंडाने त्याच्या दोन साथीदारांसोबत टिल्लू ताजपुरियावर हल्ला चढवला होता. ही हत्या इतकी निर्घृण होती की, या हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून अवघात देश हादरला होता. गँगस्टर जितेंद्र गोगी याची न्यायालयात ​​टिल्लू ताजपुरियाने हत्या केली होती. याचा बदला घेण्यासाठी टुंडा आणि त्याच्या साथीदारांनी तुरुंगात टिल्लूची हत्या केली.

काला जथेडीचे कडक बंदोबस्तात लग्न
दोन दिवसांपूर्वीच दिल्ली-हरियाणातील अनेक गंभीर गुन्ह्यांत सामील असलेला कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ ​​काला जथेडीचा लेडी डॉन मॅडम मिंझ उर्फ अनुराधा चौधरीशी द्वारका येथील एका मॅरेज हॉलमध्ये विवाह झाला. त्यांच्या लग्नासाठी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 100 हून अधिक पोलीस आधुनिक शस्त्रास्त्रांसह तैनात करण्यात आले आहेत. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Web Title: After Kaala Jathedi, notorious gangster Tunda will marry today; will tie the knot with my girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.