'मकोका'तील फरार आरोपी १५ महिन्यानंतर आरोपी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:05 PM2018-09-15T18:05:24+5:302018-09-15T18:06:09+5:30

१५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली.

After 15 months of absconding accused in Makoca arested | 'मकोका'तील फरार आरोपी १५ महिन्यानंतर आरोपी जेरबंद 

'मकोका'तील फरार आरोपी १५ महिन्यानंतर आरोपी जेरबंद 

Next

अकोला - जुने शहरात घडलेल्या विक्की खपाटे हत्याकांडानंतर आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करताच या प्रकरणातील १५ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
हरिहरपेठेतील गाडगेनगरातील रहिवासी विकास उर्फ विक्की खपाटे याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. दोन वर्षांपूर्वी दुर्गोत्सवादरम्यान त्याने योगेश चव्हाण नामक युवकाची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातून त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती. विक्की खपाटे हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. खपाटे हा गाडगेनगरात असताना सोमवार, २६ जून २०१७ रोजी दुपारी त्याच्यावर चेतन साहू, करण साहू, नितीन साहू,राजू काटोले आणि प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी आपसी वादातून धारदार कुºहाड व लोखंडी पाइपने हल्ला चढविल्याने विक्कीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी चेतन साहू, करण साहू, नितीन साहू आणि राजू काटोले,रोशन सुधाकर ताकवाले ,प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवालेसह आणखी काही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या टोळीविरुध्द मकोकानुसार कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई केल्यानंतर चार आरोपी घटनेपासूनच फरार होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने हरीहर पेठेतील रहिवासी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले यास शुक्रवारी अटक केली. ही कारवाई पथकाचे प्रमूख तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल,मनोज ठोसर यांच्यासह सायबर सेलचे गणेश सोनोने यांनी केली.

 

Web Title: After 15 months of absconding accused in Makoca arested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.