नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:03 AM2021-07-20T11:03:03+5:302021-07-20T11:03:09+5:30

11 swords seized in Nandura : दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ११ धारदार तलवारी व ५ फायटर जप्त करून दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. 

11 swords seized in Nandura | नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त

नांदुरा शहरात ११ तलवारी जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क   
नांदुरा :  गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व नांदुरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने  शहरात १८ जुलै रोजी दुपारी २ ते ५ वाजेदरम्यान दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ११ धारदार तलवारी व ५ फायटर जप्त करून दोन आरोपींविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. 
स्थानिक गुन्हे शाखा बुलडाण्याचे पथक नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी मोतीपुरा येथील सागर श्रीकृष्ण देवकर (वय २४) हा युवक साई पार्ककडे जाणाऱ्या रोडवर हातात धारदार तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यास घटनास्थळावर जाऊन तलवारीसह ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत वार्ड क्रमांक २ मधील नीलेश सुरेश डवले (वय ३५) याच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून १० धारदार तलवारी व ५ फायटर असा एकूण १०५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हाधिकारी  यांचा शस्त्रबंदीचा आदेश अमलात असतानादेखील ही शस्त्रे विक्री व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगताना आढळला. याप्रकरणी  एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांनी फिर्याद दिली. 

Web Title: 11 swords seized in Nandura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.