जामीन का होऊ देत नाही म्हणून महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 05:20 PM2019-02-02T17:20:33+5:302019-02-02T17:21:12+5:30

जेलमध्ये असलेल्या दोन नातेवाईकांचा जामीन का होऊ देत नाही, असे म्हणत सात ते आठ नातेवाईकांनी जिन्सी परिसरातील एका महिलेच्या घरात घुसून हल्ला केला.

The woman assaulted as she did not get bail | जामीन का होऊ देत नाही म्हणून महिलेला मारहाण

जामीन का होऊ देत नाही म्हणून महिलेला मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद : जेलमध्ये असलेल्या दोन नातेवाईकांचा जामीन का होऊ देत नाही, असे म्हणत सात ते आठ नातेवाईकांनी जिन्सी परिसरातील एका महिलेच्या घरात घुसून हल्ला केला. याप्रकरणी आठ जणांविरोधात जिन्सी ठाण्यात दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला.


जावेद खान, अलीम खान, रिजवान खान अफसर खान आणि अरबाज खान आणि चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहंमद जफर आणि शहाबाज जफर हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यांना जामीन मिळू नये, याकरिता तक्रारदार महिला सतत प्रयत्न करीत असते.

ही बाब आरोपींना कळाल्याने त्यांनी २८ जानेवारी रोजी अचानक जिन्सी परिसरातील तक्रारदारांच्या घरात घुसून धुडगूस घालत मारहाण केली. या घटनेप्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. 

 

Web Title: The woman assaulted as she did not get bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.