एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:37 PM2018-12-31T18:37:37+5:302018-12-31T18:40:47+5:30

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

A wedding so too ! The dinner coaches that were taken by the groom took 17 minutes to complete the ceremony | एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व खर्चास फाटा दिला छावणीत पार पडला लग्नसोहळा 

औरंगाबाद : शहरात सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू असून, प्रत्येक लग्नसोहळ्यात वऱ्हाडींना पंचपक्वान्नांचे शाही भोजन दिले जात आहे. मात्र, छावणीत रविवारी एका लग्नात चक्क वऱ्हाडींनी घरूनच जेवणाचे डबे आणून तेथे जेवण केले. कारण, वधू-वर पित्यांवर लग्नाचा कोणताही भार पडू नये. अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

छावणीतील जैस्वाल मंगल कार्यालयात दुपारी १.३० वाजता लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील जांभळी येथील वनिता चव्हाण व वाशिम येथील शेगी गावातील सुनील राठोड यांच्या विवाहासाठी शेकडो वऱ्हाडी जमले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचे बॅण्डपथक, डीजेचा दणदणाट नाही. वरात नाही, मंगलाष्टक म्हणण्यात आले नाहीत. लग्नासाठी येणारा प्रत्येक जण संत रामपालजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली सतरंजीवर बसत होता. 

केवळ धागा बांधून विवाह 
ठरलेल्या वेळी वधू-वर आले. त्यांनी एकमेकांना हार न घालता केवळ धागा बांधला आणि रमैनी (दुपारची आरती) सुरू झाली. अवघ्या १७ मिनिटांत विवाह सोहळा पार पडला. यानंतर वधू-वराला उपस्थित वऱ्हाडींनी भावी आयुष्याबदल शुभेच्छा दिल्या. लग्नात कोणताही खर्च न करण्याचा ठरविल्याने जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. वऱ्हाडींनी घरूनच अन्नपाणी आणले होते. अनेक जण वधू-वराला आशीर्वाद देऊन निघून गेले. कोणत्याही प्रकारचा भेटवस्तू, हारतुऱ्यांचा वापर येथे करण्यात आला नाही. 

असे विवाह अधिक व्हावेत 
नवरदेवाचे वडील रामजीदास चव्हाण म्हणाले की, आमच्या गुरूच्या शिकवणीनुसार आम्ही हुंडा न घेता, संसारोपयोगी वस्तू न घेता-देता,अहेर, प्रतिअहेर, असे काहीही न घेता, तसेच कोणताही अतिरिक्त खर्च न करता विवाह पार पाडला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तो प्रकार रोखण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी रमैनी विवाह 
रमैनी विवाहात वधू-वर पित्याला कुठलेही कार्यालय भाडे, वीज बिल, सफाई खर्च आदी द्यावे लागत नाही. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात येते. विवाह सोहळा सत्संगामधील एका १७ मिनिटांच्या आरतीने पार पडतो.  रमैनी विवाहामुळे समाजाचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या कमी होतील, समाजप्रबोधनासाठी असे विवाह होणे अपेक्षित असून, आज काही जणांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह असेच करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती अशोकदास आव्हाड यांनी दिली. 

Web Title: A wedding so too ! The dinner coaches that were taken by the groom took 17 minutes to complete the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.