शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या संचालकावर औरंगाबादमध्ये तिसरा गुन्हा दाखल; व्यापार्‍याची केली 2 कोटीची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 05:31 PM2018-01-31T17:31:05+5:302018-01-31T17:33:28+5:30

मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न करणार्‍या शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव सोसायटीच्या अध्यक्षासह संचालक मंडळ आणि मॅनेजरविरोधात जवाहरनगर ठाण्यात सोमवारी आणखी एक फ सवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Third auxiliary complaint filed in Aurangabad on the director of shubhkalyan multistate | शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या संचालकावर औरंगाबादमध्ये तिसरा गुन्हा दाखल; व्यापार्‍याची केली 2 कोटीची फसवणूक 

शुभ कल्याण मल्टीस्टेटच्या संचालकावर औरंगाबादमध्ये तिसरा गुन्हा दाखल; व्यापार्‍याची केली 2 कोटीची फसवणूक 

googlenewsNext

औरंगाबाद : मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न करणार्‍या शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव सोसायटीच्या अध्यक्षासह संचालक मंडळ आणि मॅनेजरविरोधात जवाहरनगर ठाण्यात सोमवारी आणखी एक फ सवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सोसायटीने तक्रारदाराची २ कोटी १९ लाख ५२ हजार २०० रुपयांची फसवणुक केल्याचे समोर आले आहे. दिलीप आपेट, भास्कर शिंदे, अजय आपेट, विजय आपेट, अभिजीत आपेट, बापुराव सोनकांबळे, शिवकुमार शेटे, राम महादेव रोडे आणि पाच महिला आरोपींचा यात समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, शुभ कल्याण मल्टीस्टेट को-आॅपरेटिव सोसायटीच्या संचालकांनी  तक्रारदार रितेश सतीश कुपलानी (३३,रा.सिंधी कॉलनी) यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोसायटीत मुदत ठेव ठेवल्यास  मुदतीनंतर अन्य वित्तीय संस्थांपेक्षा अधिक परतावा देण्याची ग्वाही दिली.आरोपींनी विश्वास संपादन केल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या सोसायटीत रोख रक्कम मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवली. या ठेवीचे प्रमाणपत्रही सोसायटीने त्यांना दिले. मुदत संपल्यानंतर तक्रारदार सोसायटीच्या कार्यालयात गेले असता कार्यालयाच्या दाराला कुलूप असल्याचे त्यांना दिसले. नंतर त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आरोपींनी आपली कट रचून आपली फसवणुक केल्याचे समजल्याने कुपलानी यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन तक्रारीची माहिती दिली.

पोलीस आयुक्तांनी तक्रार अर्जावर कारवाई करण्याचे आदेश आर्थिक गुन्हेशाखेला दिले. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तक्रारीची चौकशी करून याप्रकरणी सोमवारी रात्री जवाहरनगर ठाण्यात सोसायटीच्या संचालक मंडळासह अधिकार्‍यांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक नवले हे तपास करीत आहे.

शहरातील तिसरा गुन्हा
सोसायटीने फसवणुक केल्याचा क्रांतीचौक, सिटीचौक ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत. शिवाय राज्यातील विविध ठिकाणीही गुन्हे दाखल होत आहे. सोमवारी जवाहरनगर ठाण्यात दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. या प्रकरणातील आरोपी शेटे हा अटकेत असून अन्य आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Web Title: Third auxiliary complaint filed in Aurangabad on the director of shubhkalyan multistate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.