पावसामुळे दुसऱ्या मजल्याची भिंत शेजारील घरावर कोसळली; मलाब्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 07:02 PM2019-06-10T19:02:52+5:302019-06-10T19:05:17+5:30

सुमारे ३० फुट उंचावरून भिंतीच्या मलब्यासह घराच्या छतावरील पत्रे खाली आले.

The second floor of the wall collapsed on the neighboring house due to the rains; scrap elderly women death | पावसामुळे दुसऱ्या मजल्याची भिंत शेजारील घरावर कोसळली; मलाब्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू 

पावसामुळे दुसऱ्या मजल्याची भिंत शेजारील घरावर कोसळली; मलाब्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू 

googlenewsNext

औरंगाबाद: रविवारी सायंकाळी शहरात झालेल्या वादळी पावसानंतर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची भिंत पत्र्याच्या घरावर पडली आणि भिंतीच्या मलब्यासह पत्र्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना हर्सूल ते जटवाडा रस्त्यावरील राधास्वॉमी कॉलनीत घडली.  

कमलबाई नामदेव सोनगिरे (वय ६५,रा. राधास्वॉमी कॉलनी)असे मृत महिलेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना हर्सूल ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले की, कमलबाई सोनगिरे या कुटुंबासह राधास्वॉमी कॉलनीत पत्र्याच्या घरात राहतात. रविवारी सायंकाळी शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसानंतर रात्री साडेचार वाजेच्या सुमारास त्या घरात बसलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घराशेजारी गोविंदवाड  यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एक भिंत अचानक कमलबाई यांच्या घरावर पडली. सुमारे ३० फुट उंचावरून भिंतीच्या मलब्यासह कमलबाई यांच्या घराच्या छतावरील पत्रे खाली आले. याघटनेत कमलबाई या पत्रे आणि भिंतीच्या मलब्याखाली दबल्या गेल्या. त्यांना लोखंडी पत्र्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाल्या. 

या घटनेनंतर त्यांचे नातेवाईक तुकाराम मुरलीधर सोनवणे यांनी कमलबाई यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना कमलबाई यांचा रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हर्सूल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेविषयी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे हे तपास करीत आहेत. 

Web Title: The second floor of the wall collapsed on the neighboring house due to the rains; scrap elderly women death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.