औरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:11 AM2018-10-24T00:11:47+5:302018-10-24T00:12:18+5:30

जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींपर्यंत गेला असून, तो आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे.

The scarcity plan of Aurangabad district is Rs. 63 crores | औरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर

औरंगाबाद जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींवर

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : विविध उपाययोजनांची तरतूद

औरंगाबाद : जिल्ह्याचा टंचाई आराखडा ६३ कोटींपर्यंत गेला असून, तो आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. शासनाने ९ पैकी ८ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे स्पष्ट केले आहे. कन्नड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे दुष्काळ पाहणीच्या दुसºया कळीत सांगण्यात आले आहे.
येणाºया पावसाळ्यापर्यंत म्हणजेच नऊ महिन्यांत टंचाई निवारण्यासाठी ३२ गावांत तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कराव्या लागतील, तसेच ८४ गावांत नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, ९ विंधन विहीर दुरुस्ती, ५६४ नवीन विंधन विहिरी, ५१० गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३८० विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील. या उपाययोजनांवर ६३ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जून २०१९ पर्यंत टंचाई निवारण्यासाठी केल्या जाणाºया उपाययोजनांवर हा खर्च होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेची परिस्थिती पाहून उपाययोजना राबवल्या जातात. यात नळ योजना, विद्यमान योजनांची दुरुस्ती, विंधन विहीर व दुरुस्ती, बुडक्या घेणे, विहीर अधिग्रहण आदी उपाययोजनांचा टंचाईसदृश स्थितीमध्ये विचार केला जातो. तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा यामध्ये समावेश होतो. दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन-तीन महिन्यांचा टंचाई आराखडा तयार केला जातो.

Web Title: The scarcity plan of Aurangabad district is Rs. 63 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.