‘पूर्णा’साठी आज होणार मतदान

By Admin | Published: June 17, 2017 11:51 PM2017-06-17T23:51:26+5:302017-06-17T23:52:27+5:30

वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे.

Polling will be held today for 'Purna' | ‘पूर्णा’साठी आज होणार मतदान

‘पूर्णा’साठी आज होणार मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व साहित्यानिशी मतदान कर्मचाऱ्यांची पथक केंद्रावर रवाना केली आहेत. तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्यासाठी ६६ मतदान केंद्रावर आज मतदान होणार आहे.
वसमत तालुक्याच्या आर्थिक व राजकारणाची चावी असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ३ पॅनलचे ६२ उमेदवार मैदानात आहेत. हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या पूर्णा कारखाना निवडणुकीसाठी २४ हजार ३१३ सभासद मतदान करणार आहेत.
निवडणुकीत तीन दिग्गज नेत्यांचे पॅनल आमने-सामने आहे. प्रचारादरम्यान तिन्ही पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन, सभा, पदयात्रा आरोप प्रत्यारोपाद्वारे सभासदांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
पूर्णाच्या सभासदांनी सर्वच पॅनलप्रमुखांना सारखाच प्रतिसाद दिल्याने तिघेही आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. प्रचाराची राळ थंड झाली असून निवडणुकीसाठी प्रशासनाची जोरदार तयारी झालेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडत आहे. रविवारी होणाऱ्या मतदानासाठी शनिवारीच पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार उमाकांत पारधी, नायब तहसीलदार कानगुले, जोशी यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत.

Web Title: Polling will be held today for 'Purna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.