आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:24 AM2018-05-15T00:24:06+5:302018-05-15T00:25:05+5:30

आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ९० संस्थांची निवड

 Now, supplemental business that will start service society | आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

आता सेवा सोसायट्याही सुरू करणार पूरक व्यवसाय

googlenewsNext

रऊफ शेख
फुलंब्री : शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या खरेदी-विक्री संघ व विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली असून, या संस्था पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यासाठी सहकारी विकास महामंडळे व काही वित्तीय संस्था कर्जरूपी मदत करतील. औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० संस्था यात भाग घेणार आहेत.
ग्रामीण भागात असेलल्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या या गाव विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. यात केवळ शेतकºयांच्या हितासाठी कामकाज होते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या सहकार संस्थांकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. परिणामी, सहकार संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्या आहेत. शिवाय सोसायटीमधील कार्यरत गटसचिवांचीही वाताहत सुरू असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. याला संस्था चालविणारे संचालक मंडळ व सरकार जबाबदार आहे.
शासनाच्या नवीन धोरणामुळे आशा वाढल्या
राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने काढलेल्या नवीन आदेशानुसार या संस्था सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर कार्यक्रम घेतले जात आहेत. या संदर्भात शेतकºयांना त्यांच्या गावात जाऊन सहकार विभाग माहिती देताना दिसत आहे. शासनाच्या या नवीन धोरणामुळे सहकार संस्था सक्षम होतील, अशी आशा आहे.
१०० टक्के सभासद करणार
सहकार संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रथम गावातील सर्व शेतकºयांना सभासद करून घेतले जाणार आहे. त्यांच्यासाठी केवळ दोनशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया प्रत्येक तालुका सहायक निबंधकांकडून सुरू करण्यात आलेली आहे. येत्या वर्षभरात सर्व शेतकरी सहकार संस्थांशी जोडले जातील. प्रत्येक शेतकºयाने आपला व्यवहार संस्थेच्या माध्यमातून करावा, जेणेकरून शेतकरी व संस्था दोघांना याचा लाभ होण्यास मदत होणार आहे.
दोन कंपन्या सहभागी
शासनाच्या धोरणाला दोन वस्तू उत्पादन कंपन्यांनी सहमती दिली आहे. या कंपन्या आपली विविध प्रकारची उत्पादने सहकारी संस्थांमार्फत माफक दरात विक्री करणार असल्याने याचा फायदा शेतकरी व सहकारी संस्थांना होणार आहे.
पहिल्या टप्प्यात ९० संस्था सहभागी
सहकार संस्था सक्षमीकरण योजनेत औरंगाबाद जिल्ह्यातील ९० सहकारी सोसायट्या विविध प्रकारचे पूरक व्यवसाय सुरू करणार आहेत. यात रासायनिक, जैविक खतांची विक्री, पशुखाद्य विक्री, कापड विक्री, गांडूळ खत विक्री, तांदूळ विक्री, चहा पावडर विक्री, कृषी औजारे, स्टेशनरी दुकान, पिठाची गिरणी, ट्रॅक्टर भाड्याने देणे, कृषी मालावर प्रक्रिया करून पॅकेजिंग करून विक्री करणे आदी पूरक व्यवसायांचा समावेश आहे. ज्या ९० संस्थांनी यात भाग घेतला त्यातील काही संस्थांनी अनेक व्यवसाय सुरूही केले असून उर्वरित संस्था लवकरच व्यवसाय सुरू करणार आहेत. पूरक व्यवसायामुळे शेतकºयांसह संस्था, सोसायट्या सक्षम होऊन त्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होणार आहे, असे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे यांनी सांगितले.

Web Title:  Now, supplemental business that will start service society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.