प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:33 AM2018-11-10T11:33:26+5:302018-11-10T11:35:10+5:30

दोन्ही आरोपी गोळेगाव येथीलच रहिवासी असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Molestation of woman by obscenity during travel; two accused arrested in Golegaon | प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत

प्रवासादरम्यान अश्लील शेरेबाजी करून महिलेचा विनयभंग; गोळेगाव येथील दोघे अटकेत

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) : गरोदर महिलेस रुग्णालयात दाखल करून परतणाऱ्या एका महिलेचा प्रवासादरम्यान विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. दोन्ही आरोपी गोळेगाव येथीलच रहिवासी असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी रात्री तालुक्यातील गोळेगाव येथील महिला गावातीलच एका गरोदर महिलेस बाळंतपणासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालय घाटी येथे खाजगी वाहनातून ( क्रमांक  एम.एच.04 ई.एन. 7606 ) घेऊन गेली होती. याच वाहनातून परत येत असताना वाहनातील प्रकाश रामलाल कच्छवा,  सतीश भिक्कन घोडके ( दोघेही रा. गोळेगाव) यांनी शरणापूरफाटा ते गोळेगाव प्रवासादरम्यान महिलेवर अश्लील शेरेबाजी करून तिच्या पायास स्पर्श करत तिचा विनयभंग केला. 

याप्रकरणी पिडित महिलेने दुस-या दिवशी रात्रीचा घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. यावरून पिडित महिलेच्या नातेवाईकांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलीसांनी  दोन्ही आरोपींना विरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

Web Title: Molestation of woman by obscenity during travel; two accused arrested in Golegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.