समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:31 PM2019-05-31T17:31:30+5:302019-05-31T17:41:06+5:30

समृद्धी महामार्गावर ३७ वर्षे लागणार टोल 

Metro Rail run from Samrudhi highway is currently not possible | समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे.  १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग

औरंगाबाद : मुंबई-नागपूर महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गावरूनमेट्रोरेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. जागा उपलब्ध नसल्यामुळे मेट्रो धावणे शक्य नाही. जर भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरले, तर नव्याने भूसंपादन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

हाय स्पीड रेल्वे चा सध्यातरी मुद्दा नाही. ही रेल्वे महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही. नव्याने भूसंपादन करून रेल्वेचा विचार करावा लागेल. आठ पदरी महामार्ग होणार आहे. १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा त्यामध्ये असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले. सध्या चौपदरीकरण सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी ४९ मीटर जागा वापरली आहे. 

आठ लाख वृक्षांची लागवड
आवाज आणि तापमानाला आटोक्यात ठेवण्यासाठी सुमारे आठ लाख झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात येतील, असा दावा गायकवाड यांनी केला. सध्या १ लाख ७४ हजार ८९६ पैकी १ लाख ३० हजार ९३२ वृक्षतोड करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धीवर ३७ वर्षे लागणार टोल 
राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूरला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला प्रवासासाठी मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़मी.साठी टोल लागणार आहे. वाहनांनुसार टोलचा दर असणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण जोमाने खुला होईल. तेव्हापासून दिवसाकाठी ४० हजार वाहने त्यावरून धावतील, असा अंदाज एमएसआरडीसीने बांधला आहे. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल. 
 

Web Title: Metro Rail run from Samrudhi highway is currently not possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.