बालकावर अत्याचार करणा-या महाराजाला पैठण येथे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:04 AM2017-12-20T01:04:02+5:302017-12-20T01:04:07+5:30

बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाºया वारकरी शिक्षण संस्थेतील महाराजास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. सदरील महाराजास बुधवारी औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदामराव वारे यांनी सांगितले.

 The Maharaja, who oppressed the child, was arrested at Paithan | बालकावर अत्याचार करणा-या महाराजाला पैठण येथे अटक

बालकावर अत्याचार करणा-या महाराजाला पैठण येथे अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : बालकावर अनैसर्गिक अत्याचार करणाºया वारकरी शिक्षण संस्थेतील महाराजास मंगळवारी पोलिसांनी अटक केली. सदरील महाराजास बुधवारी औरंगाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदामराव वारे यांनी सांगितले.
तालुक्यातील वाघाडी येथील रामेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज गणेश लक्ष्मण तौर याच्यावर सोमवारी बालकावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पैठण तालुक्यातील वाघाडी शिवारातील नाथफार्म हाऊस याठिकाणी रामेश्वर भगवान वारकरी या नावाने शिक्षण संस्था असून या संस्थेत विविध भागातील मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतात.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सर्व मुले खेळत असताना महाराजाने दुपारच्या वेळी शाळेतील एका ११ वर्षीय विद्यार्थ्यास अंग दाबण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले व अत्याचार सुरू केला.
मुलाच्या आरडाओरडीने इतर मुले या खोलीकडे आल्याने मुलाची महाराजाच्या तावडीतून सुटका झाली. या मुलांनी सदरची घटना पालकांना कळवली.
घटना समजताच तेथील नागरिकांनी महाराजास बेदम चोप दिला. यामुळे महाराजास उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले होते. सोमवारी पीडित मुलाच्या पालकाने पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरुन
महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराज फरार झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार विलास दुसिंगे यांनी महाराजाचा तपास करून लोकेशन प्राप्त केले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता महाराजांच्या नातेवाईकांनी महाराजास पोलीस ठाण्यात हजर केले.

Web Title:  The Maharaja, who oppressed the child, was arrested at Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.