अखेर ‘त्या’ रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण

By Admin | Published: January 9, 2015 12:19 AM2015-01-09T00:19:55+5:302015-01-09T00:52:17+5:30

बीड : नगर परिषदेच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरूवात केली होती. मात्र निवडणूका संपल्या की या कामाकडे दुर्लक्ष केले होते.

Finally 'Hotmix' of the 'Road' completed | अखेर ‘त्या’ रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण

अखेर ‘त्या’ रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण

googlenewsNext


बीड : नगर परिषदेच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरूवात केली होती. मात्र निवडणूका संपल्या की या कामाकडे दुर्लक्ष केले होते. केवळ खडी टाकल्यामुळे अपघात होत होते. मात्र ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे बुधवारी रात्री रस्त्याचे ‘हॉटमिक्स’ पूर्ण करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील धानोरा रोड, पालवण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शन, सहयोग नगर, कालीका नगर आदी भागातील रस्ता नुतनीकरणाला सुरूवात झाली होती. निवडणूक कालावधीत या कामाला गतीही देण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला की, या रस्त्याच्या दुरूस्तीकडे कोणीच लक्ष दिले नाही. रस्त्यावर केवळ मोठी खडी टाकून ठेवल्यामुळे अपघात होते. दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. यामध्ये वाहनधारक जखमी झाले होते. ही गंभीर बाब ‘लोकमत’ने पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने हॉटमिक्स रखडल्याचा आरोप होत होता.
याचीच दखल घेत मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी रखडलेले हॉटमिक्स तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. संबंधीत अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराला धारेवर धरीत एका रात्रीत रखडलेले हॉटमिक्सचे काम केले. हा रस्ता झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Finally 'Hotmix' of the 'Road' completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.