सोयगाव तालुक्यात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:58 PM2019-04-03T18:58:52+5:302019-04-03T19:00:05+5:30

मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे डॉक्टर व महसूल पथकाने सांगितले.

farm workers death in Soygaon taluka | सोयगाव तालुक्यात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू

सोयगाव तालुक्यात उष्माघाताने शेतमजुराचा मृत्यू

googlenewsNext

सोयगाव (जि. औरंगाबाद) : सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात बुधवारी दुपारी एका शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. जैनोद्दीन मन्सूर तडवी (५५) असे या मृत शेतमजुराचे नाव आहे.

तडवी हे रोजंदारीने शेतात काम करत होते. दुपारी उन्हाच्या झळा तीव्र असल्याने त्यांना उलट्या झाल्या व ते अचानक चक्कर येऊन पडले. इतर मजुरांनी त्यांना तातडीने पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील दवाखान्यात हलविले. तेथील डॉक्टरांनी तपासून तडवी यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सोयगाव महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी तालुका प्रशासनाच्या पथकाने भेट दिली. जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या या तालुक्यात उन्हाची दाहकता वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, तडवी यांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे डॉक्टर व महसूल पथकाने सांगितले.

Web Title: farm workers death in Soygaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.