जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ

By Admin | Published: July 1, 2014 11:10 PM2014-07-01T23:10:13+5:302014-07-02T00:16:41+5:30

माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़

Due to not going to the old station, | जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ

जुन्या स्थानकात बस जात नसल्याने तारांबळ

googlenewsNext

माजलगाव: शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसस्थानकामध्ये बाहरेगावी जाणाऱ्या बसेस थांबत नसल्याने ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कर्मचारी, प्रवाशांची आतबाहेर करण्यात तारांबळ उडत आहे़ मंडळाने याची तात्काळ दखल घेऊन घेण्याची मागणी होत असून या बस स्थानकात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे येथे नवीन व जुने बसस्थानक आहे़ नवीन बसस्थानकावरुन निघालेल्या प्रत्येक बसने जुन्या बसस्थानकात जाऊन तेथील प्रवाशांना घेणे बंधनकारक आहे़ त्याप्रमाणे माजलगाव आगाराच्या बसेस थांबतही होत्या़ आता नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत़ तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात बसने येऊन जुन्या बसस्थानकात उतरतात़ तेथून परत जातात़ शेकडो शासकीय कर्मचारीही जुन्या बसस्थानकाचाच वापर करतात़ तसेच इतर शेकडो प्रवासी जुन्या बसस्थानकात उभे असतात़ असे असताना मागील एक महिन्यापासून माजलगाव, परभणी, बीड आगाराच्या चालक हे बस बसस्थानकात न आणता बाहेरुनच पुढे नेत आहेत़ त्यामुळे बस पकडण्यासाठी विद्यार्थी, वृध्द, महिला-पुरुषांना स्थानकातून बाहेर रस्ता ओलांडून बसमागे पळावे लागते़ तोपर्यंत बस निघून जाते़ या तारांबळीत वृध्दांना दम लागतो तर रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी असल्याने अनेकदा अपघात घडतात़
बसेस निघून गेल्याने विद्यार्थ्यांना खसगी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन मिळेल त्या वाहनाने गावी जावे लागते अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडत असून मानसिक त्रास होत असल्याने आगार प्रमुखांनी याची तात्काळ दखल घेऊन सर्व आगाराच्या बसेस जुन्या बसस्थानकात नेमण्योच आदेश देऊन कायमस्वरुपी कंट्रोलर तेथे नियुक्त करावा, अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड़ दत्ता रांजवण, अभिजीत कोंबडे, विक्रम शिंदे, सिध्देश धारक, धारक, ज्ञानेश्वर जुनाळ, प्रसाद खोलेंंनी दिला आहे.
(वार्ताहर)
विद्यार्थी घेतात खाजगी वाहनांचा आधार
मागील अनेक दिवसांपासून जुन्या बसस्थानकात येत नाही बस
महामंडळातील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या समस्येचे नाही गांभीर्य
विद्यार्थ्यांमधून व्यक्त होतोय संताप

Web Title: Due to not going to the old station,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.