पेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची 'गांधीगिरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:16 PM2018-05-22T16:16:18+5:302018-05-22T16:40:20+5:30

 इंधन दरवाढकरून 'अच्छे दिन' च्या नावाखाली 'महागाई चे दिन' दिल्याबद्दल एनएसयुआयकडून पेढे वाटून गांधीगिरी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

Distributing sweets; NSUI's 'Gandhigiri' on fuel hike | पेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची 'गांधीगिरी'

पेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची 'गांधीगिरी'

googlenewsNext

औरंगाबाद :  इंधन दरवाढकरून 'अच्छे दिन' च्या नावाखाली 'महागाई चे दिन' दिल्याबद्दल एनएसयुआयकडून पेढे वाटून गांधीगिरी करत निषेध व्यक्त करण्यात आला. आज दुपारी क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर हे अनोखे आंदोलन करण्यात आले.  

'बहुत हुई महंगाई की मार...' असा नारा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने इंधन दरवाढ करत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारकडून निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचा भ्रम निराश झाला असून त्यांनी जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे असा आरोप करत  एनएसयुआय औरंगाबाद जिल्हा शाखेकडून आज दुपारी क्रांती चौकात निषेध करण्यात आला. वाढती महागाई कमी करण्यात सरकारचे अपयश आणि सरकारी धोरणांचा निषेध करत त्यांनी वाहनचालकांना पेढे वाटत गांधीगिरी केली. यावेळी वाहनचालकांनीसुद्धा इंधन दरवाढीवर संताप व्यक्त केला.  

( फोटोफ्लिक : पेट्रोल पंपावर वाटले पेढे; इंधन दरवाढीवर एनएसयुआयची औरंगाबादेत 'गांधीगिरी' )

आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सागर साळुंके, सुरज निकम, अजय रननवरे, जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, जिल्हा महासचिव रोहित बनकर, प्रथमेश देशपांडे, अक्षर जेवरीकर, देव राजळे, उमेश जगदाळे, आनंद मगरे, सुरज बुट्टे ,प्रतीक शिंदे  आदींची उपस्थिती होती. 

Web Title: Distributing sweets; NSUI's 'Gandhigiri' on fuel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.