युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या

By Admin | Published: September 14, 2014 11:55 PM2014-09-14T23:55:32+5:302014-09-15T00:02:27+5:30

जालना : जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने सरशी मारली.

In the coalition alliance, two Panchayat Samiti | युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या

युतीच्या ६ तर आघाडीच्या ताब्यात २ पंचायत समित्या

googlenewsNext

जालना : जिल्ह्यात आठ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने सरशी मारली. शिवसेना व भाजपाच्या वाट्याला प्रत्येकी तीन सभापती पदे तर दोन्हींना अनुक्रमे दोन उपसभापती पदे मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ठिकाणांवर सभापती तर एका ठिकाणी उपसभापती पद मिळविले. काँग्रेसला दोन ठिकाणी उपसभापती पदावरच समाधान मानावे लागले. तर एका ठिकाणचे उपसभापतीपद रिक्त ठेवण्यात आले आहे.
जालना पंचायत समिती काँग्रेस आघाडीच्या ताब्यातून हिसकावून घेण्यात सेना-भाजपाला यश आले आहे. मनसेचे सदस्य अनिल उफाड यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने युतीचे संख्याबळ ९ झाले. एकूण १६ सदस्य असलेल्या या पंचायत समितीमध्ये बहुमत मिळाल्याने सभापती पदी सेनेच्या द्रौपदाबाई मुरलीधर थेटे तर उपसभापती पदी भाजपाचे गणेश नरवडे यांची निवड झाली.
परतूर पंचायत समितीच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण भाजपाचे तुकाराम बोनगे हे राकाँचे कपिल आकात यांच्या गटात गेल्याने निकाल आकात यांच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र बोनगे ऐनवेळी स्वगृही परतल्याने निकाल भाजपाच्या बाजूने लागला. सभापती पदी पुन्हा भाजपाच्या छाया माने यांनी तर उपसभापती पदी बोनगे यांची निवड झाली.
मंठा सभापतीपदी शिवसेनेच्या उर्मिलाताई सरोदे तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संतोष पवार यांची निवड झाली.
मंठ्यात राकाँ-काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत म्हणजे सात सदस्य असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी राजकीय खेळी केल्याने काँग्रेसचे दोन सदस्य शिवसेनेच्या गोटात आले.
भोकरदन पंचायत समितीमध्ये भाजपा-सेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतीपदी भाजपाच्या संगीता लोखंडे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे नवनाथ दौड यांची निवड झाली.
घनसावंगी पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे बहुमत आहे. त्यामुळे सभापती पदी शिवसेनेचे प्रेमसिंग खेमा राठोड तर उपसभापती पदी डॉ.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली.
बदनापूर पं.स.च्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अदनान हमीदोदीन व उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जाफराबाद पंचायत समितीमध्ये सभापतीपदी रमाबाई चंद्रकांत चौतमल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदाकरीता शिवसेना सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने अखेर उपसभापतीपद रिक्त ठेवण्यात आले.
अंबडच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गावडे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे मदनराव जायभाये व शिवसेनेचे दिनेश काकडे यांच्यात लढत होऊन ११ विरुद्ध ५ मतांनी जायभाये विजयी झाले. या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the coalition alliance, two Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.