Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:35 PM2018-09-10T12:35:08+5:302018-09-10T12:39:16+5:30

इंधन दर वाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Bharat Bandh Updates: Composite response to Bharat bandh in Aurangabad; Congress demonstrates on petrol pump | Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

Bharat Bandh Updates : औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद;कॉंग्रेसकडून पेट्रोल पंपावर निदर्शने

googlenewsNext

औरंगाबाद : इंधन दर वाढी विरोधात कॉंग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील पेट्रोल पंप चालकांकडून पंप बंद ठेवण्यात आले. जालना रोडवर कॉंग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. 
 

कॉंग्रेसचे पेट्रोल पंपासमोर निदर्शने 
कॉंग्रसकडून शहरातील पेट्रोल पंपावरसमोर सरकार विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली. जालना रोडवरील सेव्हन हिल येथे कॉंग्रेस महिला आघाडीने इंधन दरवाढीचा निषेध करत निदर्शने केली. वाळूज- पंढरपूर येथील तिरंगा चौकातही  आंदोलन करण्यात आले. 

मनसेने वाहनचालकांना वाटले ड्रॉपने पेट्रोल 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज क्रांती चौकात वाहनधारकांना ड्रॉपने थेंब थेंब पेट्रोल वाटप करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये इंधन भरण्यात आले होते. यावेळी मनसेने एक फोटो पॉइंट ही तयार केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रासह 'मोदी सेठ इंधन दरवाढीबद्दल धन्यवाद' असा मजकूर लिहण्यात आला आहे. 

Web Title: Bharat Bandh Updates: Composite response to Bharat bandh in Aurangabad; Congress demonstrates on petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.