Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 04:42 AM2018-05-13T04:42:41+5:302018-05-14T10:41:18+5:30

गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली.

Aurangabad riots kill billions of rupees | Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

Aurangabad Violence : औरंगाबादमधील दंगलीने कोट्यावधींचे नुकसान

googlenewsNext

औरंगाबाद : येथील गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये मोबाइल देण्या-घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून शुक्रवारी रात्री शहरात जातीय दंगलच पेटली. मध्यरात्री सुरू झालेली जाळपोळ, दगडफेकीसह लुटालुटीच्या घटना शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होत्या. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही काळासाठी मोबाइलची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

पोलिसांनी सुमारे ५० ते ६० जणांना ताब्यात घेतले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदी आहे. समाजकंटकांनी लावलेल्या आगीत जगनलाल छगनलाल बन्सिले (७२) यांचा होरपळून मृत्यू झाला, तर हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अब्दुल हॅरिस अब्दुल हरुन कादरी (१७) हा युवक ठार झाला. हिंसाचारात २५० हून अधिक जण जखमी झाले. जमावांने शेकडो दुकाने, चार
चाकी व दुचाकी वाहने पेटवली. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गांधीनगरात शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये बसलेल्या चार जणांनी एका तरुणाचा मोबाइल घेतला होता. तो परत मागण्यासाठी
गेलेल्या तरुणाला मारहाण करून हाकलून देण्यात आले. त्यानंतर तो तरुण त्याच्या साथीदारांना घेऊन आला. त्यातून दोन गट भिडले आणि दगडफेक, जाळपोळीच्या घटनांना सुरुवात झाली. गांधीनगर रस्त्यावरील कूलर मार्केटमधील दुकानांची आणि वाहनांची जमावाने तोडफोड करण्यास सुरुवात
केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांचे पथक व शीघ्र कृती दल तातडीने घटनास्थळी आले.

Web Title: Aurangabad riots kill billions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.