उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:13 PM2019-01-23T23:13:09+5:302019-01-23T23:13:25+5:30

शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.

Before the summer the water in the vicinity was raised | उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

उन्हाळ्याआधीच वरोऱ्यात पाणी प्रश्न पेटला

Next
ठळक मुद्देदोन दिवसांचा अल्टिमेटम : महिलांचा नगर परिषदेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शहरातील खांजी वार्ड प्रभाग क्र.३ येथे उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी समस्येने डोके वर काढले आहे. मागील एक महिन्यापासून प्रभागातील पाणीपुरवठा कोलमडल्याने वॉर्डातील संतप्त महिलांनी बुधवारी नगरपरिषदेवर मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.
नगरसेविका चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष अहतेशम अली यांना दिले. सदर मागण्या त्वरित मान्य न झाल्यास नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
वरोरा नगर परिषद ही शेकडो वर्ष जुनी असूनसुद्धा नागरिकांना आपल्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. नगर परिषदेत आजपर्यंत अनेक पक्षाच्या सत्ता बसल्या. मात्र नागरिकांच्या मुलभूत सुविधा अद्यापही मिळालेल्या नाही. काही प्रभागामध्ये उन्हाळा येण्याआधीच पाणी समस्येने डोके वर काढले असून खांजी वॉर्ड येथे मागील एक महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नसल्याने थंडीच्या दिवसात नागरिकांचे घसे कोरडे पडले आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रकला चिमूरकर यांच्या नेतृत्वात पाणी टंचाईविरोधात नगर परिषदेवर एल्गार करीत शेकडो महिलांसह मोर्चा काढून मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, पाणी पुरवठा सभापती छोटूभाई शेख व नगराध्यक्ष अहतेशाम अली यांना निवेदन देवून समस्या सोडविण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला. अन्यथा समस्येचे निराकरण न झाल्यास मटका फोड आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका चिमूरकर यांनी दिला.

वरोरा क्षेत्रामध्ये सुरु झालेली पाणी पुरवठा योजना ही १९७४ सालची असल्याने आताचा वाढलेला शहराचा भाग व मागणी आणि पुरवठा याचा तुटवडा पडला असल्याने बºयाच ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरली जात नसल्याने बºयाच भागात पाणी फोर्सने जात नाही. त्यामुळे पाणी पोहचत नसल्याने ही अडचण येत आहेफ. पाणी पुरवठा एक दिवस आड दिल्याने सर्व भागात बरोबर पाणी मिळेल. यासाठी १ फेब्रुवारीपासून त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल.
- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी.

Web Title: Before the summer the water in the vicinity was raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.