चंद्रपूरसाठी अचानक विलास मुत्तेमवारांचे नाव चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 04:39 PM2019-03-14T16:39:39+5:302019-03-14T16:40:10+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासाठी साठी काँग्रेसकडून शिवसेनेचा एक स्थानिक नेता आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नागपूर येथील एका नेत्यामध्ये घमासान सुरू असताना गुरुवारी अचानक नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत आले आहे.

Suddenly, the name of Vilas Muttemwar was discussed in Chandrapur | चंद्रपूरसाठी अचानक विलास मुत्तेमवारांचे नाव चर्चेत

चंद्रपूरसाठी अचानक विलास मुत्तेमवारांचे नाव चर्चेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासाठी साठी काँग्रेसकडून शिवसेनेचा एक स्थानिक नेता आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नागपूर येथील एका नेत्यामध्ये घमासान सुरू असताना गुरुवारी अचानक नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांचे नाव चर्चेत आले आहे.
मुत्तेमवार यांचे नाव पुढे येण्यामागे काही महत्त्वपूर्ण बाबी त्यांना चंद्रपूरशी जोडणाऱ्या असल्याचे बोलले जात आहे. मुत्तेमवार हे काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून परिचित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात मोडणाऱ्या तत्कालिन चिमूर लोकसभा मतदार संघातून त्यांनी तब्बल पाचवेळा निवडणूक लढली आहे. दरम्यान, १९८०, १९८४ या दोन निवडणूक लागोपाठ जिंकल्या. यानंतर १९८९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर १९९१ ची निवडणूक त्यांनी जिंकून पराभव झटकला. यामुळे त्यांची चंद्रपूर जिल्ह्याशी नाळ जुडलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी असलेली त्यांची सक्रियता त्यांचे नाव २०१९ च्या निवडणुकीसाठी पुढे येण्यास पुरेसी असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी दोन गट आधीच दिल्लीत कंबर कसून आहे. या भांडणात माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार यांच्या रुपाने तिसरा पर्याय प्राप्त झाल्याचेही बोलले जात आहे. पक्षश्रेष्ठी सुरूवातीपासून प्रयत्नरत असेलल्या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करते वा ही दोन्ही नावे बाजूला सारून मुत्तेमवारांचा पर्याय निवडते, हे बघण्यासारखे असेल.

Web Title: Suddenly, the name of Vilas Muttemwar was discussed in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.