चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:07 AM2018-02-06T11:07:01+5:302018-02-06T11:09:07+5:30

मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे.

Srushti Bhagwat from Chandrapur District is the first in the state State Public Service Commission Examination | चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

चंद्रपूर जिल्ह्यातील सृष्टी भागवत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून पहिली

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागात निवडनियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल तालुक्यातील बेंबाळ येथील सृष्टी दिलीप भागवत ही विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती महिला संवर्गात राज्यातून पहिली आली आहे. ती राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरली आहे.
सृष्टीचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण बेंबाळ येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण ब्रम्हपुरीतील नेवजाबाई कन्या विद्यालयात झाले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातून पूर्ण केले. सृष्टीला दिल्ली येथील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे ही नोकरी नाकारून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियोजनपूर्वक अभ्यास आणि कठोर परिश्रमामुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

Web Title: Srushti Bhagwat from Chandrapur District is the first in the state State Public Service Commission Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा