कोठारीतील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:31 AM2017-07-25T00:31:16+5:302017-07-25T00:31:16+5:30

वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी कोठारी गावातील समस्या जाणू घेण्यासाठी कोठारी पोलीस स्टेशन सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

Solve problems in the warehouse | कोठारीतील समस्या सोडवा

कोठारीतील समस्या सोडवा

Next

चंदनसिंग चंदेल यांचे निर्देश : अधिकाऱ्यांसोबत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी कोठारी गावातील समस्या जाणू घेण्यासाठी कोठारी पोलीस स्टेशन सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या त्वरीत निकाली काढण्याच्या सूचना बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर व बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक के. डी. बोकडे यांना दिल्या.
बैठकीला उपस्थित नागरिकांनी बँक इंडियाचे शाखा व्यवस्थापक नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक देत नाहीत, बेरोजगारांना मुद्रा कर्जाबाबत सहकार्य करीत नाही, खातेदारांना बँकेच्या सूचना योग्य प्रकारे देत नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. तर नवीन खाते उघडण्यासाठी विविध अडचणी निर्माण करीत असतात, याबाबत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पीक विमा, बँक विमा व कर्जमाफीबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध समस्या निस्तारण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्यांची पूर्तत: करण्यास कुचराई दिसल्यास पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेवून आढावा घेण्यात येईल, असे चंदेल यांनी यावेळी सांगितले.
ग्रा.पं. सदस्य सुनील फरकाडे यांनी गावातील नागरी समस्यांबाबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेल यांना माहिती दिली. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोठारीचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, तहसीलदार विकास अहीर, बँक शाखा व्यवस्थापक बोबडे, जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार, पं.स. उपसभापती इंदिरा पिपरे, पं.स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, सहकारी संस्थेचे नवघरे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु आदींची उपस्थिती होती.
यावेळी अमोल कातकर, विनोद बुटले, स्नेहल टिबडीया, संतोष लोनगाडगे, रुपेश वासमवार, सुरेश राजुरकर, आदींनी समस्या मांडल्या.

Web Title: Solve problems in the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.