पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:14 PM2018-01-01T23:14:25+5:302018-01-01T23:14:45+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्परतेने कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी आहेत.

Police personnel felicitated | पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next
ठळक मुद्देउत्कृष्ट कामगिरीची दखल : लॉयन्स क्लबतर्फे सन्मान

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्परतेने कर्तव्य बजाविणारे पोलीस कर्मचारी आहेत. परंतु, या पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी ही पडद्यामागील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकाराप्रमाणे असते. त्यांच्या कामगिरीची दखल घेत ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते चंद्रपुरात गौरव करण्यात आला.
चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे सुरु असलेल्या लॉयन्स एक्स्पो मेलामध्ये चंद्रपूर पोलीस विभागातर्फे महत्त्वाच्या विविध विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे. लॉयन्स क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते पोलीस दलातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट व तत्पर कर्तव्य बजाविणाºया १७ पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी तसेच लॉयन्स क्लबचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नववर्षाच्या पर्वावर पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याने एक अमुल्य भेट व पुढील कर्तव्य काळात आणखी चांगली कामगिरी करण्याकरिता मिळालेली एक ऊर्जा असल्याचे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.
या पोलीस कर्मचाऱ्यांचा झाला सत्कार
वाचक शाखेचे पोलीस हवालदार रामभाऊ सोनुने, सायबर सेलचे नापोशि मुजावर अली, पोलीस शिपाी छगन जांभुळे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार दौलत ईस्टाम, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार अनिल माहोरे, वाहतूक शाखेचे रवी आरडे, कोर्ट पैरवी अबिता गुरफुडे, बीडीडीएसचे पोलीस हवालदार विरेंद्र यादव, श्वान पथकाचे पोलीस हवालदार उत्तम आवळे, वंदना बोरसरे, अंगुली मुद्रा, नियंत्रण कक्षाच्या भाग्यश्री सोनकांबळे, सी- ६० पथकाचे नापोशि जयसिंग जाधव, दंगा नियंत्रण पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दडमल, आपत्कालीन पथकाचे पोलीस हवालदार अशोक गरगेलवार, पोलीस हवालदार राजेंद्र तुमसरे, वाहतूक शाखेचे भगवान राठोड यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Police personnel felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.