बफर झोनमधील वन्यप्राण्यांची तहान भागविणार पाणवठे

By admin | Published: May 12, 2014 11:27 PM2014-05-12T23:27:50+5:302014-05-12T23:27:50+5:30

सेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असून जंगलातील पाणी आटायला लागले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना पाणवठय़ाशिवाय पाण्याचा आधार नसल्याने मूल

Panavathe will give the thirst of wildlife in buffer zone | बफर झोनमधील वन्यप्राण्यांची तहान भागविणार पाणवठे

बफर झोनमधील वन्यप्राण्यांची तहान भागविणार पाणवठे

Next

मूल : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत असून जंगलातील पाणी आटायला लागले आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना पाणवठय़ाशिवाय पाण्याचा आधार नसल्याने मूल येथील बफर झोन परिक्षेत्रातील ६६२ वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. यासाठी काही पाणवठय़ाची दुरुस्ती तर १७ पाणवठय़ाची निर्मीती करून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

सदर पाणवठय़ावर हमखास प्राणी येतात, हे हेरून अवैध शिकार करणारे टोळके परिसरात असल्याची चर्चा होत आहे. यासाठी वनविभागाने अधिकारी, कर्मचारी व मजुरांना कामावर लावले आहे. ९६७0.५९ हेक्टर बफरझोन क्षेत्रात ६६२ वन्यप्राणी असल्याची नोंद आहे.

वनपरिक्षेत्र कार्यालय मूलचे विभाजन होऊन बफरझोन परिक्षेत्राची स्वतंत्रपणे निर्मीती करण्यात आली. ९६७0.५९ हेक्टर असलेल्या या क्षेत्रात वनविभागाने मागील वर्षी २२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मचानीवर बसून प्रगणना केली. यावेळी वाघ-२, बिबट-३, भेकडी-१0, चितळ-९८, सांबर-४0, अस्वल-२२, रानकुत्रे-२७, कोल्हे-४, रानडुक्कर-८६, निलगाय-१३, रानगवे-४१, वानर-२५४, जवादी मांजर-१, मुंगुस-६, मोर-२९, रानकोंबडी-१४, ससे-१३ असे ६६२ वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली होती. यावर्षी यात वाढ झाली असून ६६२ पेक्षा जास्त वन्यप्राणी असावेत, असा अंदाज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिसलेल्या प्राण्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या वन्यप्राण्याचे संरक्षण करणे ही जबाबदारी वनविभागाची आहे. हे हेरून वनविभागाने कृत्रिम व स्वत: असे १६ पाणवठे तयार करून त्यात प्राण्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. १६ पाणवठय़ामध्ये कुंभळमट, गिलीबिली मठ, मोलझरी तलाव, डोनी तलाव,आंबेझरी, धारणी आंबा, ढोबरी आंबा, आंजन बोडी, मारोडा डोंगरदेव झरण, वानरचुना, जानाळा तलाव आदीचा समावेश आहे. पाणवठय़ावर शिकार्‍यांचीही नजर असते. येथील वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने यांनी सांगितले की, डोनी, फुलझरी, मारोडा क्षेत्रात रात्रंदिवस मजूर, वनकर्मचारी व अधिकारी यांची देखरेख करण्यासाठी कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे. पानवठे व इतर ठिकाणी जिथे प्राणी येतात, त्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Panavathe will give the thirst of wildlife in buffer zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.