पासपोर्ट सेवा केंद्रासाठी आज अधिकाऱ्यांची चमू चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:08 PM2018-05-24T23:08:43+5:302018-05-24T23:09:14+5:30

केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी दाखविली आहे.

Officers' team Chandrapur today for the Passport Seva Kendra | पासपोर्ट सेवा केंद्रासाठी आज अधिकाऱ्यांची चमू चंद्रपुरात

पासपोर्ट सेवा केंद्रासाठी आज अधिकाऱ्यांची चमू चंद्रपुरात

Next
ठळक मुद्देनागरिक आनंदात : हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांची फलश्रुती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी दाखविली आहे. चंद्रपूर महानगरात या सेवा केंद्राची सुरूवात करण्याच्या दृष्टीने नागपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चमू २५ मे रोजी चंद्रपुरात दाखल होत आहे.
या भेटीमध्ये ही चमू डाक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी सेवा केंद्राच्या उभारणी संदर्भात चर्चा करून आवश्यक माहिती घेणार आहेत. नागपूर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पारपत्रा अधिकारी सी.एल. गौतम व त्यांचे सहकारी अधिकारी कुमार यांच्या नेतृत्वामध्ये ही चमू चंद्रपूर येथे येत आहे. चंद्रपूर हे महानगराचे स्थान असल्याने या शहरात पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी भूमिका घेत केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रिय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली होती.
सदर चर्चा सकारात्मक झाल्याने व विदेश मंत्रालयाने तिसऱ्या टप्प्यात चंद्रपुरातील पारपत्रा सेवा केंद्रास मान्यता प्रदान केल्याने हे केंद्र यथावकाश सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरून कार्यवाहीस सुरूवात झाली असल्याचे संकेत या चमुच्या दौºयामधून मिळत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, उच्च शिक्षणासाठी विदेशात जावू इच्छिणारे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांसाठी मोठ्या प्रतीक्षेनंतर पारपत्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचे स्वप्न केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे साकार होणार आहे.
चंद्रपुरातील या पारपत्रा सेवा केंद्राचे कार्यान्वय शीघ्रगतीने व्हावे, यासाठी ना. हंसराज अहीर प्रयत्नशील आहेत.

Web Title: Officers' team Chandrapur today for the Passport Seva Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.