नवरगावची मृणाली गहाणे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:39 AM2019-06-09T00:39:31+5:302019-06-09T00:39:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ...

Nawargaon's Mrinali Gahan is the top in the district | नवरगावची मृणाली गहाणे जिल्ह्यात अव्वल

नवरगावची मृणाली गहाणे जिल्ह्यात अव्वल

Next
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के । विशाल मासीरकर द्वितीय तर अनुराग ढोंगळे व तन्मय वड्डेलवार तृतीय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला. ाागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. नवरगाव येथील भारत विद्यालयातील मृणाली मनोहर गहाणे ही ९५.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे. त्यानंतर चंद्रपूर येथील भवानजीभाई चव्हाण विद्यालयातील विशाल महादेव मासीरकर हा ९५.२० टक्के हा द्वितीय तर याच विद्यालयातील अनुराग भारत ढोंगळे व चंद्रपूर येथील विद्या विहार कॉन्व्हेंटचा तन्मय वड्डेलवार हे दोघेही ९५ टक्के गुण घेत तृतीय आले आहेत.
नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७० शाळांमधून ३० हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३० हजार १२३ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण १९ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल दोन हजार ३६८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. आठ हजार ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सात हजार ८९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर एक हजार ४८८ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात चवथ्या क्रमांकावर आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे. दरम्यान, आज शनिवारी निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेत चांगलीच गर्दी दिसून आली.

चंद्रपूर तालुका निकालात अव्वल
यंदा निकालात शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांवर मात केल्याचे तालुक्यातील निकालावरून स्पष्ट होते. जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७१.०५ टक्के आहे. या तालुक्यातील ७९ शाळांमधून सहा हजार ३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील चार हजार २८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात चिमूर तालुका पिछाडीवर राहिला. या तालुक्याचा निकाल केवळ ५२.४५ टक्क़े लागला. जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रह्मपुरी, मूल, सावली, वरोरा या तालुक्यांचा निकाला चांगला लागला.

निकालात पुन्हा गर्ल्स शायनिंग
ँमागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार २३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १५ हजार ५८३ मुले परीक्षेला बसली. यातील नऊ हजार २२३ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ५९.१९ आहे.
यासोबतच एकूण १४ हजार ७३६ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार ५४० मुलींनी परीक्षा दिली. पैकी १० हजार ५३३ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ७२.४४ आहे.

पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ४५.१६ टक्के
दहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ४५.१६ टक्के लागला आहे. एकूण एक हजार २७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील एक हजार २६० विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४५.१६ आहे. पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर सहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Nawargaon's Mrinali Gahan is the top in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.