एका मिस्ड कॉलने बंदुकीतून सुटतात चक्क सात गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:05 AM2018-01-17T00:05:15+5:302018-01-17T00:06:33+5:30

मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते.

A Missed Call That Comes Out Of Guns, Almost 7 Tablets | एका मिस्ड कॉलने बंदुकीतून सुटतात चक्क सात गोळ्या

एका मिस्ड कॉलने बंदुकीतून सुटतात चक्क सात गोळ्या

Next
ठळक मुद्देबालवैज्ञानिकाचा प्रयोग : भारतभूमीच्या रक्षणासाठी विक्रांतची ‘सोल्जरलेस गन’

मंगेश भांडेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते. हाच मोबाईल मिनी कम्प्युटरचेही काम करतो.एक पाऊल पुढे टाकत याच मोबाईलचा आधार घेत ब्रह्मपुरीच्या एका बालवैज्ञानिकाने मिस्ड कॉलवर चक्क सात गोळ्या सुटणारी ‘सोल्जरलेस गन’ बनविली. भारतभूमीच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात जवानांसाठी ही बंदूक नवे बळ देणारी असल्याचे हा बालवैज्ञानिक सांगतो.
देशाच्या सीमेवर पाकिस्तान तर गडचिरोली, छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना अनेक जवानांना वीर मरण येते. अशा घटना सतत घडत असून मोठी जिवितहानी होत आहे. ही जिवितहानी रोखण्यासाठी ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद महाविद्यालयातील इयत्ता अकरावीतील विज्ञान शाखेचा विद्यार्थी विक्रांत भाऊराव कुथे याने प्रा. सुशिल कावळे यांच्या मार्गदर्शनात सादर केलेली ‘सोल्जर लेस गन’ची प्रतिकृती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहे.
विक्रांतने प्रयोगाच्या माध्यमातून मांडलेली ‘एके-४७ सोल्जर लेस गन’ पूर्णपणे मानवविरहीत चालणारी आहे. विशेष म्हणजे, सीमा सुरक्षेसाठी जवानाची कोणतीही जीवतहानी न होता ही गन आपला जवान किंवा सामान्य नागरिक कोण, हे ओळखूनच शत्रूला बंदुकीच्या गोळीने कसे भेदता येईल, हे त्याने प्रयोगातून दाखविले आहे. बंदुकीच्या निशाण्यावर कुणीही आल्यास त्याचे क्लोजअप फोटो सेन्स करून ओळख पटविता येते. त्यामुळे शत्रूची ओळख पटताच गोळी झाडता येणे शक्य आहे. गोळी झाडल्यानंतर शत्रू ठार झाला किंवा नाही, हेही ओळखण्याची यंत्रणा या बंदुकीत आहे. ड्रोन वापरूनही या गनचा वापर करता येऊ शकतो.
कंट्रोल रूममधून करता येते शत्रूला लक्ष्य
‘सोल्जर लेस गन’ इलेक्ट्रो मॅग्नेटीव्ह व्हेबने रोटेड ६० डिग्री फिरून शत्रूचा लक्ष्य करते. ही गन कोणत्याही भूभागावर ठेवून वापर करता येणे शक्य आहे. या गनमध्ये विशेष प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड असलेला मोबाईल लावल्यानंतर जीपीएसद्वारे ट्रॅक करता येते. कंट्रोल रूममध्ये बसून गन ठेवलेल्या परिसरातील दूरवरच्या हालचाली पाहता येणार आहे. परिसरात शत्रू असल्यास मिस्ड कॉल देवून गोळी झाडता येते. एका मिस्ड कॉलने सात गोळ्या या गनमधून सुटतील.
सोल्जर गनची वैशिष्ट्ये
या गनसाठी अत्यंत कमी खर्च येत असून हाताळणेही सोपे आहे. कोणत्याही भूभागावर ठेवून गनला दूरवरून कंट्रोल करता येवू शकते. ही गन दिवस असो किंवा रात्र २४ तास कंट्रोल रूममधून हाताळता येते. या गनमध्ये आणखी काही गोष्टी विकसीत करून रणांगणात वापरता येवू शकते, असे विक्रांतने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: A Missed Call That Comes Out Of Guns, Almost 7 Tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.