सार्वजनिक नळाऐवजी न.प.ने दिले घरोघरी नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:15 AM2019-05-06T00:15:44+5:302019-05-06T00:16:18+5:30

बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले.

House taps provided by NAP instead of public tap | सार्वजनिक नळाऐवजी न.प.ने दिले घरोघरी नळ

सार्वजनिक नळाऐवजी न.प.ने दिले घरोघरी नळ

Next
ठळक मुद्देपाण्याच्या अपव्यय टाळला : सार्वजनिक नळांच्या तोट्या वारंवार चोरी जात असल्याने पालिका त्रस्त

वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले. मात्र उपयोग झाला नाही. अखेर सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरीत पालिकेने नळ बसविला.
बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठावर बल्लारपूर शहर वसले आहे. या नदीच्या पात्रात बाराही महिने मुबलक पाणी राहात असल्याने पेपरमिलसारखा मोठा उद्योग येथे आला. तसेच बल्लारपूर शहरात एक-दोन वर्षांचा अपवाद वगळता येथे पाण्याची तीव्र टंचाई भासली नाही. भर उन्हाळ्यातही बल्लारपूरवासीयांना गरजेएवढे पाणी मिळत आले आहे. येथे एकीकडे सार्वजनिक व खासगी नळ, बोअरींग या साधनांद्वारे पाण्याची मुबलकता आहे तर दुसरीकडे त्याच पाण्याचा अपव्ययही तेवढ्याच प्रमाणात दिसून येतो आहे. याचे महत्वाचे कारण भुरट्या चोरांकडून सार्वजनिक नळांच्या तोटींची होत असलेली चोरी, हे आहे. चोरीचा हा प्रकार येथे वारंवार होतो. तोटी नसल्यामुळे नळाद्वारे पाणी विनाकारण वाहून जात आहे. तोटीच्या चोरी आळा बसावा याकरिता नगर परिषदेने पाईपाला तोट्यांना वेल्डिंगने जोडले. तरीही उपयोग झाला नाही. तोटीसह पाईपला कापून नेले. बल्लारपूर शहरात एकूण १६९ ठिकाणी सार्वजनिक नळ स्टँड पोस्ट लावले आहेत. पाण्याच्या देयकापोटी नगर परिषदेला, महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाला महिनाकाठी पाच लाख रूपये द्यावे लागत आहेत. सार्वजनिक नळातून सुमारे १२०० कुटुंब पाणी भरत असतात. या १६९ नळांमधून, त्यांना तोटी नसल्याने किती पाणी विनाकारण वाया जात आहे, याची कल्पना येते. मौल्यवान पाणी वाया जाऊ नये, याकरिता नगर परिषद प्रशासन आणि मजिप्रा यांनी चर्चा करून त्यावर एक उपाय योजला तो असा. सार्वजनिक सर्व नळ बंद करायचे. या नळांवर अवलंबून असलेल्या सर्वच घरांना नळ जोडून पाणी द्यायचे. नवीन नळ कनेक्शनकरिता प्रत्येकाकडून ५४० रूपये डिपाझीट म्हणून घ्यायचे. नळ जोडणीचा सर्व खर्च नगर परिषदेने उचलायचा, असे ठरले आणि तीन महिण्यापासून त्यावर काम सुरू आहे. निर्धारित एकूण १२०० मधून आजवर ८९५ घरी नळ जोडणी होऊन त्यांच्या घरी नळाने पाणीही जाऊ लागले आहे. सर्व १२०० घरी नळ जोडणी पूर्ण होऊन पाणी जाणे सुरू झाल्यानंतर सार्वजनिक नळ बंद केले जाणार आहे. या उपाय योजनानंतर तोटी चोरीचा प्रकार होणार नाही. आज विनााकारण पाणी वाया जात आहे ते बंद होईल.
पालिकेला एक कोटीचा खर्च
यावर नगर परिषदेचे एक कोटी रूपये खर्च होणार आहे. या योजनेतील नळधारकांना काहीच महिने मोफत पाणी मिळेल. नंतर त्यांच्या वापराप्रमाणे त्यांना पाण्याचे बिल भरावे लागणार आहे. न. प. च्या शहरात ५४ कुपनलिका आहेत. त्या मात्र तशाच ठेवल्या जाणार आहेत. बल्लारपूर येथील जीवन प्राधीकरणाला वर्धा नदीपासून पाणी पुरवठा होत असतो. नदीच्या पात्रात एकूण तीन विहीरी आहेत. त्यातून पाण्याचा उत्सर्ग होत असतो. सद्या पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. पाण्याची पातळी घसरल्यास चंद्रपूरजवळील माना कोळसा खाणीतून पाणी घेण्याची तयारी मजिप्राने चालविली आहे. मागील वर्षी शेवटी शेवटी माना कॉलरीचे पाणी घ्यावे लागले होते. एकंदरीत, बल्लारपुरात सध्या पाण्याची टंचाई नाही, तरीही लोकांनी पाण्याचा वापर गरजे एवढाच करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासन आणि मजिप्राने नागरिकांना केले आहे.

Web Title: House taps provided by NAP instead of public tap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.