स्वच्छतेच्या दिशेने जिल्ह्याचे दमदार पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:02 PM2019-03-06T23:02:34+5:302019-03-06T23:04:41+5:30

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटामध्ये चंद्रपूर महानगराने देशात २९ वा तर राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

The district's strong step towards cleanliness | स्वच्छतेच्या दिशेने जिल्ह्याचे दमदार पाऊल

स्वच्छतेच्या दिशेने जिल्ह्याचे दमदार पाऊल

Next
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण निकाल जाहीर : मूल देशातून तर चंद्रपूर महानगर राज्यातून तिसरे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून जिल्ह्याने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत एक लाख लोकसंख्येच्या गटातून मूल शहर देशात तिसरे तर सिटीझन फिडबॅक गटामध्ये चंद्रपूर महानगराने देशात २९ वा तर राज्यातून पहिला क्रमांक पटकाविला आहे.
बुधवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मूल नगर परिषदने स्वच्छता अभियान दरम्यान अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवून लोकसहभाग वाढविला. केंद्र सरकारने दिलेल्या निकषांचे तंतोतत पालन करून दमदार कामगिरी केली. एक लाख लोकसंख्येतील नगर परिषदांसाठी घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अ‍ॅपवरून तक्रारींचे निवारण आणि कचरामुक्त शहर असे वर्गीकरण करण्यात आले होते. प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन करून वर्षभर यशस्वीरित्या मोहीम सुरू राबविण्यात आली. नगर परिषदने प्रभागनिहाय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीपर नाविण्यपूर्ण सभा घेतल्या होत्या. स्वच्छता अ‍ॅपवर आलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण केल्या. शिवाय, नागरिकांच्या विधायक सुचनांची दखल घेऊन नवीन उपक्रमांवर भर दिला. शहराचा पाच हजार गुणांपैकी चार हजार २८ गुण मिळवून देशातून तिसरा पुरस्कार पटकाविला. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार आदींनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
यशस्वी झाले ‘सिटीझन फीडबॅक’
चंद्रपूर महानगरपालिकेला नागरिकांच्या प्रतिक्रीया म्हणजे ‘सिटीझन फीडबॅक’ या गटात देशातून २९ वा पुरस्कार मिळाला आहे. हा पूरस्कार राज्यातून तिसरा आहे. २ आॅक्टोबर २०१४ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत हे अभियान राबविण्यात आले. चंद्रपूर महानगराने अनेक उपक्रम राबविले होते. यंदा सर्वेक्षणाची व्याप्ती वाढवून एक लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील चार हजार २३७ शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण झाले. यामध्ये चंद्रपूर महानगराने भारतातून नागरिकांच्या प्रतिक्रीया या घटकात राज्यातून तिसरा आणि विदभार्तून पहिला क्रमांक पटकाविला आहे.

मागील वर्षी स्वच्छतेत मागे पडलेल्या चंद्रपूर शहराने यंदा देशातून २९ वा पुरस्कार पटकाविला. स्वच्छता राखण्यात मनपा प्रशासन कुठेच कमी पडले नाही. नागरिकांच्या प्रतिक्रिया या घटकात गतवर्षी शहर मागे होते. ही कमरता यंदा भरून काढली. स्वच्छता ही नैतिक जबाबदारी समजून नागरिकांनी विविध प्रश्नांना प्रेरणादायी उत्तरे दिली. नागरिक, नगरसेवक व पदाधिकारी व प्रशासनाच्या सहकार्यामुळे चंद्रपूरला पुरस्कार मिळाले.
- अंजली घोटेकर, महापौर चंद्रपूर

मूल शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगर परिषदेने अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले. कालमर्यादा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. शहरातील सर्व नागरिक व संघटनांनी मदत केले. त्यामुळे जनजागृती यशस्वी झाली. पुरस्काराने आत्मविश्वास वाढला. विविध सेवांचा दर्जा सुधारण्याला यापुढे प्राधान्य देणार आहोत. हा राष्ट्रीय पुरस्कार सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.
- रत्नमाला भोयर, नगराध्यक्ष भोयर, मूल

Web Title: The district's strong step towards cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.