१६ हजार ७८६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके

By admin | Published: June 6, 2017 12:34 AM2017-06-06T00:34:59+5:302017-06-06T00:34:59+5:30

सर्वशिक्षा अभियानातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.

16 thousand 786 students get textbooks | १६ हजार ७८६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके

१६ हजार ७८६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके

Next

शिक्षण विभागाचे नियोजन: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
राजकुमार चुनारकर। लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : सर्वशिक्षा अभियानातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६० व खासगी अनुदानित ४५ शाळांमधील १६ हजार ७८६ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.
पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. पहिली ते आठवितील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षीसुद्धा प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित शाळा, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी शिक्षण विभागाने शासनाकडून मागणी केली होती. त्या मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत चिमूर पंचायत समितीने १६ हजार ७८६ पाठ्यपुस्तके मागितली आहेत.
मराठी माध्यमांची सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. त्या खालोखाल सेमी इंग्लिश माध्यम आणि उर्दू, हिंदी माध्यमांचे विद्यार्थी आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांना ही पाठ्यपुस्तके वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तकांची विद्यार्थी संख्येसह मागणी जिल्हास्तरावर करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १६० शाखा व खासगी अनुदानित ४५ शाळेतील १६ हजार ७८६ विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्हास्तरावर केली असून पुस्तके प्राप्त होताच मुख्याध्यापका मार्फत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.
- किशोर पिसे, प्र. गटशिक्षणाधिकारी पं.स. चिमूर

Web Title: 16 thousand 786 students get textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.