१४ गावांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:34 PM2018-08-14T22:34:56+5:302018-08-14T22:35:13+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

14 villages do not have roads | १४ गावांना रस्ताच नाही

१४ गावांना रस्ताच नाही

Next
ठळक मुद्देनागरिकांचे हाल : स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण दुर्लक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षांचा कालावधी लोटला. मात्र राजुरा तालुक्यातील १४ गावांना जायला अद्याप रस्ताच नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
राजुरा तालुक्यातील पारधीगुडा- मंगी, चंदनवाही, कळमना, चार्ली-निर्ली, नवेगाव- बाखडी, हिरापूर-निमगणी, भोयगाव-धानोरा, कवडाळा ही गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. रस्त्याअभावी या गावात अद्याप एसटी जात नाही. पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. विद्यार्थ्यांना पायी शाळेत जावे लागते. वेळेवर शाळेत पोहचत नसल्याने तासिका वाया जातात. या गावांना जोडणारा रस्ताच नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. सरकारने स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली. मोठ्या शहरांवर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. परंतु, आदिवासी दुर्गम भागात अद्याप रस्ते तयार झाले नाहीत. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक असल्याचे दर पाच वर्षांच्या निवडणूक प्रचारातून सांगितले जाते. पण ही गावे रस्त्याविना आहेत. १४ गावांतील रस्त्यांचे भाग्य उजळले नाही. नागरिकांना रस्त्याविना चिखल तुडवत जावे लागते.

Web Title: 14 villages do not have roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.