एसबीआयला 14 कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:30+5:30

चंद्रपूरातील स्टेट बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी ४४ कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज होते. कर्जप्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्ज वाटप करून बॅंकेची १४ लाख २५ हजार ६१ हजार ७०० रुपयांनी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार ८ मार्च २००३ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली. 

14 crore to SBI | एसबीआयला 14 कोटींचा चुना

एसबीआयला 14 कोटींचा चुना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अधिक गृहकर्जासाठी कर्जदारांनी बॅंकेचे अधिकारी व एजंटसह हातमिळवणी केली. बनावट आयकर कागदपत्र सादर करीत स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चक्क १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ११ कर्जधारकर, एक एजंट व बॅंकेच्या ३ तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने तीनही बॅंक अधिकाऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
श्वेता महेश रामटेके (४२, रा. बाबूपेठ), वंदना विजयकुमार बोरकर (४०, रा. नगिनाबाग, चंद्रपूर), योजना शरद तिरणकर (४२, रा. दाताळा, चंद्रपूर), शालिनी मनीष रामटेके (४५, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीष बलदेव रामटेके (४७, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीषा विशाल बोरकर (रा. आंबेडकर वॉर्ड, भद्रावती), वृंदा कवडू आत्राम (४९, रा. वरोरा), राहुल विनय रॉय (३६, रा. माजरी), गजानन दिवाकर बंडावार (३९, रा. धाबा), राकेशकुमार रामकरण सिंग (४२, रा. सास्ती राजुरा), गीता गंगादिन जागेट (वय ५३, रा. घुग्घुस असे अटकेतील कर्जदारांचे तर एंजट गणेश देवराव नैताम (३६, रा. पोंभुर्णा ह. मु. कोसारा) व पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी (३९, रा. तुकूम, चंद्रपूर), विनोद केशवराव लाटेलवार (३८, ह. मु. हनुमाननगर तुकूम, चंद्रपूर, मूळ पत्ता वार्ड क्र. ४ सावली), देवीदास श्रीनिवासराव कुळकर्णी (५७, रा. मुकुंदनगर, अकोला मूळ पत्ता बादुले बुद्रूक, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी अटकेतील बॅंक अधिकाऱ्यांची नावे आहेत. आरोपींवर ४२०, ४०६, ४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भादंविचा गुन्हा दाखल केला. तपासात बनावट आयकर रिटर्न सादर केल्याचे समोर आले. त्यावरून ही अटकेची कारवाई  करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के करीत  आहेत. तपासात पुन्हा काही बडे मासे अडकण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे.

पुन्हा काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर 
या प्रकरणात तीन बॅंक अधिकाऱ्यांना अटक केली आहे. परंतु, पुन्हा बॅंकेचे अधिकारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच फरार कर्जधारक व एजंटना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले आहे. बॅंक अधिकाऱ्यांच्या अटकेसाठी एक पथक मुंबई येथे रवाना झाले असल्याची माहिती आहे

अशी झाली फसवणूक

- चंद्रपूरातील स्टेट बॅक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजोग अरुणकुमार भागवतकर यांनी ४४ कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज होते. कर्जप्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्याकनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्ज वाटप करून बॅंकेची १४ लाख २५ हजार ६१ हजार ७०० रुपयांनी फसवणूक झाली आहे, अशी तक्रार ८ मार्च २००३ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली. 

या संदर्भात सुमारे दीड वर्षापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांच्याकडे रितसर तक्रार केली होती. यानंतर चाैकशीला वेग आला. चाैकशीनंतर संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
- राजीव कक्कड, 
शहर अध्यक्ष, राकाॅ चंद्रपूर

 

Web Title: 14 crore to SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.