मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:32 PM2021-06-17T17:32:01+5:302021-06-17T18:07:37+5:30

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत.

Mega recruitment of 1850 to 2070 posts in Mumbai Municipal Corporation; Apply online till June 26 | मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी

मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी

googlenewsNext

मुंबई – महापालिकेच्या विविध विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण १८५० ते २०७० रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईनपद्धतीने हा अर्ज भरायचा आहे. यासाठी २६ जून २०२१ पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे.

कोणकोणत्या पदांसाठी निघाली भरती?

वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेस्टिव्हिस्ट(MD Medicine) अटेस्टंट(एमडी) नेफ्रोलॉजिस्ट, ओलॉजिस्टन, न्यूरोलॉजिस्ट या पदांसाठी ५०-७० जागा निघाल्या आहेत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता

पद क्र १ -  

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, अतिविशेषकृत शाखेचा पदवीधारक असावा

उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा

पद क्र. २ –

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा(आयुर्वेद व होमिओपविक) नोंदणीकृत असावा

पद क्र ३ –

जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधारक असावा

त्याचसोबत योग्य त्या नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावा

वयोमर्यादा – ९ जून २०२१ पर्यंत उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३३ वर्षापेक्षा अधिक असता कामा नये

मानधन – रिष्ठ वैद्यकीय सल्लागार – दीड लाख ते २ लाख, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ५० हजार ते ८० हजार आणि प्रशिक्षित अधिपरिचारिका – ३० हजार रुपये

नोकरीचं ठिकाण – मुंबई  

अर्ज करण्याची शेवटची मुदत – २६ जून २०२१

सर्वसाधारण अटी

१. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवारा विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.
२. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवारविरुद्ध पोलीस चौकशी/ न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास/ शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
३. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेवाराने कुकीची माहिती /प्रमाणको कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्यास निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल.
४. उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियोक्त्यांचे ना- हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.
५. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्पावर थांबविण्याचे अधिकार महापालिका आयुक्त यांना आहेत.
६. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल
७. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये १०० /- किंवा विधि आकाराप्रमाणे (वेतन मिळतीनुसार) ब्रान्ड पेपरवर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबधित उमेदवारास करावा लागेल.
८.कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने ३० दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक

अधिकृत संकेतस्थळ : portal.mcgm.gov.in

अर्ज या ईमेलवर पाठवावे – covid19mcgm@gmail.com/stenodeanl@gmail.com

 

Web Title: Mega recruitment of 1850 to 2070 posts in Mumbai Municipal Corporation; Apply online till June 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.