येळगावनजीक ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:44 AM2018-04-27T01:44:19+5:302018-04-27T01:44:19+5:30

बुलडाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ घडली. 

Yelgaonj truck killed in a truck | येळगावनजीक ट्रकच्या धडकेत एक ठार

येळगावनजीक ट्रकच्या धडकेत एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ घडली. 
तालुक्यातील खूपगाव येथील सागर आनंदा मोरे (वय २३) हा मित्र रवींद्र नाटेकरसोबत दुचाकीने बुलडाणा येथून घरी जात होता. बुधवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान येळगावनजीकच्या भगीरथ कारखान्याजवळ आयशर क्रमांक (एम. एच. ४३ व्ही. ५२३९ ) ने दुचाकी (क्र.एम. एच. १२ डी. व्ही. ८५७३) ला धडक दिली. या अपघातात सागर मोरे जागीच ठार झाला, तर रवींद्र नाटेकर याला जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास अकोला हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर आयशरचा चालक योगेश गायकवाड (रा. कानडजा जि. जळगाव खान्देश) याने शहर पोलीस स्टेशन गाठले. त्याच्याविरुद्ध कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: Yelgaonj truck killed in a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.