वाशिम : नाफेडकडे महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची तूर मोजणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:03 PM2018-03-04T20:03:54+5:302018-03-04T20:04:19+5:30

वाशिम: जिल्ह्यात यंदा महिनाभरापूर्वी नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु बहुतांश शेतकरी नाफेडकडे तूर विकण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ८ हजारांवर शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी महिनाभरात केवळ १३३५ शेतकºयांची १२४०० क्ंिवटल तूर मोजण्यात आली असल्याचे घेतलेल्या माहितीवरू न स्पष्ट झाले आहे. 

Washim: Counting of 1335 farmers only for Nafed in a month! | वाशिम : नाफेडकडे महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची तूर मोजणी!

वाशिम : नाफेडकडे महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची तूर मोजणी!

googlenewsNext
ठळक मुद्देविलंबाचा परिणामशेतकरी तूर विकण्यास उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: जिल्ह्यात यंदा महिनाभरापूर्वी नाफेडच्या तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु बहुतांश शेतकरी नाफेडकडे तूर विकण्यात उत्साही नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ८ हजारांवर शेतक-यांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली असली तरी महिनाभरात केवळ १३३५ शेतक-यांची १२४०० क्विंटल तूर मोजण्यात आली असल्याचे घेतलेल्या माहितीवरू न स्पष्ट झाले आहे. 

शासनाच्यावतीने शासकीय दराने नाफेडच्या तूर खरेदीची घोषणा केली; परंतु या घोषणेनंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू होण्यास दीड महिन्यापेक्षा अधिक विलंब झाला. याचा फटका शेतक-यांना बसला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी अपु-या पावसामुळे उत्पादन घटले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. जेमतेम पिकलेली तूर घरात ठेवून चालणार नसल्याने त्यांनी तूर विकण्याची घाई सुरू केली. त्यावेळी शासनाने नाफेडच्या तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या प्रक्रियेनंतर तब्बल दीड महिन्यांनी या तूर खरेदीचा मुर्हूत निघाला. तोपर्यंत नोंदणी केलेल्या हजारो शेतकºयांनी अडचणीपोटी तूरही विकली. काही शेतकरी नाफेडकडे तूर विकण्याची प्रतिक्षा करीत होते; परंतु नाफेडकडून उशिरा मिळणारा मोबदला, तसेच त्या ठिकाणी होत असलेल्या तुरीच्या चाळणीमुळे शेतकºयांना नाफेडकडे तूर विक णे फारसे फायद्याचे नसल्याचे दिसून आहे. त्यातच नाफेडच्या तुलनेत बाजारात मिळणारे भावही फारसे कमी नसल्याने शेतकरी नाफेडऐवजी व्यापा-यांना तूर विकण्यावर भर देऊ लागले. त्यामुळे नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर गेल्या महिनाभरात मंगरुळपीर येथील नाफेड केंद्रावर १३३५ शेतक-यांची १२४०० क्विंटल ३० किलोच तूर खरेदी होऊ शकली. प्रत्यक्षात येथील कें द्रारवर ८४३५ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे अद्याप ७१०० शेतकºयांची तूर मोजणे बाकी असले तरी, आता त्यामधील बहुतेक शेतकºयांनी आपली तूर व्यापा-यांकडे विकली असल्याची शक्यता आहे.  

Web Title: Washim: Counting of 1335 farmers only for Nafed in a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.