अज्ञात वाहनाची ऑटाेला धडक; एक ठार, दाेन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 05:58 PM2022-01-03T17:58:21+5:302022-01-03T17:58:30+5:30

Accident News : तुकाराम ज्ञानबा सोनवणे (वय ३०) रा़ देऊळगाव वायसा असे मृतकाचे नाव आहे़.

Unidentified vehicle hits Auto; One killed, two seriously | अज्ञात वाहनाची ऑटाेला धडक; एक ठार, दाेन गंभीर

अज्ञात वाहनाची ऑटाेला धडक; एक ठार, दाेन गंभीर

Next

लोणार : प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटाेला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर दाेन जण गंभीर जखमी झाले़ ही घटना २ जानेवारी राेजी रात्री घडली़. तुकाराम ज्ञानबा सोनवणे (वय ३०) रा़ देऊळगाव वायसा असे मृतकाचे नाव आहे़
देऊळगाव वायसा येथील तुकाराम साेनवणे, शिवानंद तात्याराम सोनवणे (वय ३५), वैभव लक्ष्मण सोनूने (वय २५) हे ऑटाे एमएच २८ आर २६१९ ने वडगाव तेजन येथून ३ जानेवारी राेजी रात्री गावाकडे परत येत हाेते़ दरम्यान, वडगाव तेजन बस स्थानकावर ऑटाेला अज्ञात वाहनाने जाेरदार धडक दिली़ यामध्ये तुकाराम ज्ञानबा साेनवणे हे जागीच ठार, तर अन्य दाेघे जण गंभीर जखमी झाले़ गंभीर जखमींना तातडीने बुलडाणा येथे उपचारार्थ हलवण्यात आले़ मात्र, प्रकृती गंभीर असल्याने बुलडाणावरून जालना येथे हलवण्यात आले़ दाेन्ही जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे़ याप्रकरणी ज्ञानबा गंगाराम सोनवणे रा़ देऊळगाव वायसा यांच्या माहितीवरून लोणार पाेलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण खनपटे करीत आहेत़.

Web Title: Unidentified vehicle hits Auto; One killed, two seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.