राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:36 AM2017-12-04T00:36:13+5:302017-12-04T00:37:36+5:30

भरधाव  टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे  सकाळी ८ वाजता घडली.

Tanks overturned on national highway; One killed | राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार

Next
ठळक मुद्देवाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; चालकाचा जागीच मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाट्याजवळ घडली घटना 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भरधाव  टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे  सकाळी ८ वाजता घडली.
नागपूरकडे जात असताना बाळापूरनजीक वाहनावरील नियंत्रण सुटून हा अ पघात झाला. यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प होती.

ट्रक-ट्रेलरच्या अपघातात पाच जखमी
ट्रक व ट्रेलरचा समोरा-समोर अपघात झाल्याने पाच जण जखमी झाले. ही  घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील  पारखेडनजीक एका धाब्याजवळ घडली. या अपघातात ट्रक क्रमांक आरजे  १९ क्यूई 0७४५ या ट्रकला विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रेलर क्रमांक पीबी 0७ व्ही  0७६४ ने जोरदार धडक दिली. यात ट्रक ड्रायव्हर छोटू खान अल्लाउद्दीन खान  रा. जाखड, जि. जोधपूर, अ. इस्माइल अ. सत्तार, साबीरअली गफूर हे तिघे,  तर ट्रेलर चालक इंद्रजित यादव आणि कृष्णकुमार यादव हे दोघे जखमी झाले.  जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात  आले.

Web Title: Tanks overturned on national highway; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.