खामगाव पंचायत समिती सभापतीच्या गाडीच्या धडकेत विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:35 AM2021-06-30T10:35:05+5:302021-06-30T10:35:12+5:30

Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash : खामगाव पंचायत समितीच्या सभापती मोरे यांच्या शासकीय वाहनाने रोहन शिवाजी महालेला धडक दिली.

Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash | खामगाव पंचायत समिती सभापतीच्या गाडीच्या धडकेत विद्यार्थी ठार

खामगाव पंचायत समिती सभापतीच्या गाडीच्या धडकेत विद्यार्थी ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील एका विद्यार्थ्याला पंचायत समिती सभापती रेखा मोरे यांच्या गाडीने रविवारी धडक दिली. त्यामुळे गोंधळलेला विद्यार्थी समोरून येत असलेल्या आॅटोवर जाऊन आदळल्याने गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत विद्यार्थ्याला खामगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला अकोला येथे हलवित असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

प्राप्त माहिती नुसार ज्ञानगंगापूर येथील विद्यार्थी रोहन शिवाजी महाले (१८) पिंपळगाव राजा येथील मित्रासोबत खामगाव येथील तंत्रनिकेतनमध्ये अर्ज भरण्यासाठी एमएच- २८-११२२ या क्रमांकाच्या दुचाकीने येत होता. दरम्यान, पिंपळगाव राजा नजीक असलेल्या एका पेट्रोलपंपा जवळ खामगाव पंचायत समितीच्या सभापती मोरे यांच्या शासकीय वाहनाने त्याला धडक दिली.

या धडकेमुळे गोंधळलेला रोहण महाले समोरून येणाºया आॅटोवर जाऊन आदळला. यात गंभीर जखमी झालेल्या रोहणला सुरूवातीला खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ झाल्याने अकोला येथे हलविण्यात आले.

दरम्यान, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सभापती रेखा मोरे यांची शासकीय गाडी त्यांचे पती युवराज मोरे चालवित होते. घटना घडल्यानंतर त्यांनी महत्वाचे काम असल्याचे सांगत, घटनास्थळावरून खामगावकडे काढता पाय घेतला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईकांच्या सांगण्यानुसार रोहणच्या मृत्यूस युवराज मोरे हेच जबाबदार असल्याची ओरड होत आहे.

सभापती रेखा मोरे यांचे पती युवराज मोरे यांना शासकीय गाडी चालविण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत रोहणच्या नातेवाईकांनी युवराज मोरे यांना अटक करण्याची मागणी प्रवीण महाले, लक्ष्मण हेंड, संतोष महाले, तसेच ज्ञानगंगापूरचे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी केली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी पिंपळगाव राजा पोलिसांशी संपर्क केला असता, त्यांनी घटनेबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले. यासंदर्भात सभापती पती युवराज मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.

पिंपळगाव राजा पोलिसांची वागणूक संशयास्पद!

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला. मात्र, घटनेला ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पिंपळगाव राजा पोलिस युवराज मोरे यांना पाठीशी घालत आहेत. यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा आरोप रोहनच्या नातेवाईकांचा आहे. वाकूड येथील हल्ला प्रकरणातील आरोपीला तब्बल तीन महिन्यांपासून पाठीशी घालणाऱ््या पिंपळगाव राजा पोलिसांकडून या अपघात प्रकरणी अपेक्षा करावी तरी कशी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: Student killed in Khamgaon Panchayat Samiti chairman's car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.