धक्कादायक! सासूने बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

By सदानंद सिरसाट | Published: February 23, 2024 04:53 PM2024-02-23T16:53:41+5:302024-02-23T16:54:08+5:30

माहेरी असलेल्या पत्नीच्या घरी जाऊन शिवीगाळ करणे, तसेच सासू व पत्नी दरवाजा उघडत नसल्याने जावयाने दारावर दगडाने हल्ला सुरू केला.

son in law dies after mother in law beats her with a bat in buldhana | धक्कादायक! सासूने बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

धक्कादायक! सासूने बॅटने मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

सदानंद सिरसाट,बुलढाणा  : माहेरी असलेल्या पत्नीच्या घरी जाऊन शिवीगाळ करणे, तसेच सासू व पत्नी दरवाजा उघडत नसल्याने जावयाने दारावर दगडाने हल्ला सुरू केला. यावेळी संतप्त सासूने मागच्या दारातून येत जावयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकत बॅटने केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेगाव येथील फुलेनगरातील रहिवासी दीपक गजानन हाडोळे याला मद्यपानाचे व्यसन होते. त्याच्या व्यसनाला कंटाळून त्यांची पत्नी वैष्णवी ही मागील ४-५ वर्षांपासून जवळा बु. येथे आई सुशीला अवधूत (बाप) काळे हीचे सोबत राहत होती. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास दीपक हाडोळे हा मद्यपान करून जवळा बु. येथे आला. तसेच, सासूच्या घरासमोर शिवीगाळ करीत होता.

 घराच्या दरवाजावर लाथा व दगड मारून उघडण्याचा प्रयत्न करीत होता. सासू किंवा पत्नी दरवाजा उघडत नसल्यामुळे मोठमोठे दगड दारावर मारत होता. त्यामुळे सासू सुशीला काळे ही घराच्या मागील दरवाजातून बाहेर आली. दीपक हाडोळे याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच, बाजूला पडलेल्या लाकडी बॅटने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाची पत्नी वैष्णवी दीपक हाडोळे हिने शेगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी सुशीला काळे हीला अटक करण्यात आली. पुढील तपास पीएसआय गजानन शिंदे करीत आहेत.

Web Title: son in law dies after mother in law beats her with a bat in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.