सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:45 AM2018-02-09T00:45:45+5:302018-02-09T00:46:27+5:30

मलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी  झाल्याची घटना  ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली.

Sindhkhedraja MLA Dr. Shashikant Khedekar's vehicle accident | सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाहनाला अपघात

सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांच्या वाहनाला अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्रीची घटना; चालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी  झाल्याची घटना  ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली.
आ. खेडेकर यांना घेण्याकरिता एमएच-२८-एजे-७७0७ या वाहनाद्वारे  चालक गजानन कुल्ले मलकापूरकडे जात होता. दरम्यान, त्यांच्या वाहनाला अपघात घडला. या बाबीपासून अनभिज्ञ असलेले आमदार खेडेकर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चालक न दिसल्याने त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला; परंतु त्यांना कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने ते अँड. साहेबराव सरदार यांच्या वाहनाने बुलडाण्याकडे रवाना झाले.
८ फेब्रुवारी रोजी पहाटे त्यांचे वाहन अपघातस्थळी क्षतिग्रस्त आढळून आले. याची माहिती मिळताच  खा.  प्रतापराव जाधव यांचे स्वीय सहायक डॉ. गोपाल डिके व शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमी चालकास रुग्णालयात दाखल केले. 

Web Title: Sindhkhedraja MLA Dr. Shashikant Khedekar's vehicle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.