विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:57 PM2019-04-30T14:57:52+5:302019-04-30T14:58:03+5:30

नांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे.

sabotaging in electric meter, four booked; | विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

विद्युत मीटरमध्ये छेडछाड करणारे रॅकेट सक्रीय;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी करून देणारे रॅकेट नांदुरा शहरात सक्रिय झाले असल्याचे समोर आले आहे. त्याविरुद्ध वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केल्याची घटना घडली आहे.
शहरातील सिंधी कॉलनी भागातील वीज ग्राहकांच्या घरी २७ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान वीज चोरीच्या उद्देशाने वीज मीटरमध्ये छेडछाड करताना चार जण वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे त्या चौघांविरूध्द वीज चोरी तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नादुरुस्त असलेले मीटर बदलल्यानंतर दोनच दिवसांनी वीज चोरी करण्याच्या हेतूने मीटरशी छेडछाड करण्यात येत असल्याची माहिती मिळाली असता, नांदुरा शहर अभियंता ढोले, नांदुरा ग्रामीण अभियंता सोयासकर, वारिस्ट तंत्रज्ञ शे मंजूर, कंत्राटी कामगार गजानन मुरकर व उपकार्यकरी अभियंता नांदुरा उप विभाग यांनी पाळत ठेऊन २७ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास सिंधी कॉलनीत अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयन्त केला. मात्र तो मीटरचे झाकण काढून व इन्कमरचे वायर काढून पळून गेला. परंतु त्याचा फोटो काढण्यात कर्मचाºयांना यश आले. यानंतर वीज ग्राहकास त्या व्यक्तीचे नाव विचारले असता, टोलवा टोलवीचे उत्तर देण्यात आले. दरम्यान कार्यकारी अभियंता मलकापूर यांच्या मार्गदर्शनात राजू आयलदास लाखांनी, नैवतमदास आयलादास लाखांनी, गजानन शेलकर वय आणखी एक अज्ञात यांच्या विरोधात विद्युत कायदा २००३ चे कलम १३८ नुसार व इतर कलमाखाली नांदुरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर ढोले यांनी तक्रार दिली. विशेष म्हणजे यामधील अज्ञात आरोपीने वीजवितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ शे मंजूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर गजानन शेलकर यांने कंत्राटी कामगार गजानन मुरकर यांना कोणत्याही अधिकाºयाला न सांगण्या बाबत दमदाटी करून निघून गेला होता. (प्रतिनिधी)

Web Title: sabotaging in electric meter, four booked;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.