खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:09 PM2018-10-24T13:09:14+5:302018-10-24T13:09:37+5:30

खामगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेगाववरून बुलडाणाकडे जाताना बुधवारी ११ वाजता त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Raj Thackeray welcomes Khamgaon; Interaction with farmers | खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद 

खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद 

Next

खामगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेगाववरून बुलडाणाकडे जाताना बुधवारी ११ वाजता त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजार समितीमधील काही शेतकºयांशी संवादही साधला. 
येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सध्या त्यांचा विदर्भ दौरा असून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी त्यांचे खामगाव शहरात आगमन झाले असता, स्थानिक विकमसी चौकात मनसे शहराध्यक्ष नंदु भट्टड, माजी जिल्हाध्यक्ष बाबा काळे आणि मार्गदर्शक विठ्ठल लोखंडकार यांच्यासह मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रसंगी या परिसरातील परिसरातील शेतकºयांच्या राज ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या. स्वागतानंतर राज ठाकरेंचा ताफा सरळ टिएमसीकडे वळला. येथे राज ठाकरे यांनी शेतकºयांनी संवाद साधला. यावेळी डिगांबर कवडकार यांच्यासह शेतकºयांनी राज ठाकरे यांना निवेदनही सादर केले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, उपसभापती निलेश दिपके, सचिव दिलीप देशमुख, संचालक दिलीप पाटील, राजाराम काळणे यांनीही शेतकºयांना सोयाबीन आणि तुरीचे पैसे त्वरीत मिळावे, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती राज ठाकरे यांना केली.

Web Title: Raj Thackeray welcomes Khamgaon; Interaction with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.